पाकिस्तानमध्ये ओटीटीवर ट्रेंडिंग होतोय 'हा' स्पाय थ्रिलर चित्रपट, अमृता खानविलकरची आहे खास भुमिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:43 IST2026-03-27T14:35:39+5:302026-03-27T14:43:47+5:30
'धुरंधर: द रिव्हेंज'च्या जबरदस्त क्रेझमध्येही एक स्पाय थ्रिलर चित्रपटाला पाकिस्तानी प्रेक्षकांची पसंती.

सध्या जगभरात 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट गाजतोय. प्रत्येकाच्या तोंडी याच चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या यशामुळे प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा स्पाय थ्रिलर चित्रपटांची क्रेझ वाढलेली दिसून येत आहे.

भारतातच नाही तर पाकिस्तानातही भारतीय स्पाय थ्रिलर चित्रपट मोठ्या प्रमाणावर पाहिले जात आहेत.

सध्या पाकिस्ताना एक भारतीय चित्रपट ट्रेंडिंग होतोय. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.

विशेष म्हणजे या बॉलिवूड चित्रपटात मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचीदेखील खास भुमिका आहे.

तर हा चित्रपट आहे 'राझी' (Raazi). मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे.

'राझी' या चित्रपटात मुख्य भुमिकेत आलिया भट आणि विकी कौशल यांची मुख्य भुमिका होती. 'राझी' हा चित्रपट एका भारतीय 'रॉ' (RAW) एजंटची कथा सांगतो, जी गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात जाते.

हा चित्रपट पाकिस्तानातील नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या सर्वाधिक पाहिला जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

पाकिस्तानातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे की, हा चित्रपट 'टॉप १०' च्या यादीत आला आहे.

'राझी' हा चित्रपट पाकिस्तानात केवळ एक-दोन दिवसांपासून चर्चेत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट गेल्या ३ आठवड्यांपासून सातत्याने नेटफ्लिक्सच्या 'टॉप १०' यादीत आपले स्थान टिकवून आहे.

सध्या हा चित्रपट पाकिस्तानातील ट्रेंडिंग यादीमध्ये ९ व्या क्रमांकावर आहे. जुना चित्रपट असूनही पाकिस्तानात मिळालेला हा प्रतिसाद थक्क करणारा आहे.

















