अक्षय खन्नाला बॉलिवूडमधली 'ही' अभिनेत्री वाटायची सगळ्यात सेक्सी, म्हणाला- "तिच्याकडे फक्त बघतच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:44 IST2025-12-18T11:39:33+5:302025-12-18T11:44:21+5:30
मुलाखतीत अक्षय खन्नाला करण जोहरने "बॉलिवूडमधली सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण?" असा प्रश्न विचारला होता.

'धुरंधर' या सिनेमात रहमान डकैतची भूमिका साकारल्याने अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षयच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

जिकडे तिकडे फक्त अक्षय खन्ना आणि त्याच्या स्वॅगची चर्चा होताना दिसत आहे. अशातच त्याची जुनी मुलाखत व्हायरल होते आहे.

अक्षय खन्नाने करण जोहरच्या एका मुलाखतीत हजेरी लावली होती. या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हेदेखील उपस्थित होते.

या मुलाखतीत अक्षय खन्नाला करण जोहरने "बॉलिवूडमधली सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण?" असा प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना अक्षय खन्नाने ऐश्वर्या रायचं नाव घेतलं होतं. "मी जेव्हा जेव्हा तिला भेटतो तिच्याकडे बघतच राहतो. तिच्यावरुन सहज कोणालाही नजर हटवता येत नाही", असं तो म्हणाला होता.

पुढे त्याने म्हटलं होतं की "खरंतर तिला आता या सगळ्याची सवय झालीये. पण एका पॉइंटला आपल्याला लाज वाटते अरे आपण किती वेळ बघतोय".

"ती सुंदर आहेच पण मनाने सुद्धा ती तेवढीच सुंदर आहे. ताल सिनेमात आम्ही एकत्र काम केलं होतं... खरंच ती खूप छान काम करते", असंही अक्षय खन्ना म्हणाला होता.

अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय या दोघांनी एकत्र 'ताल', 'आ अब लौट चले' या सिनेमांमध्ये काम केलं होतं.

















