अक्षय खन्नाचा आज वाढदिवस, किती वर्षांचा झाला? अजून अविवाहित; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:04 IST2026-03-28T16:01:33+5:302026-03-28T16:04:31+5:30

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अक्षय खन्नाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी कायम उत्सुक असतात.

बॉलिवूडमधील दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. अलिकडेच आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर (Dhurandhar) या स्पाय थ्रिलर चित्रपटात अक्षय खन्ना झळकला होता.

'धुरंधर'मधील अक्षय खन्नाची वास्तववादी भूमिका, त्याचा अफगाणी डान्स, त्याचा एकूण 'चार्म' सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर गाजला. पण, 'धुरंधर'नंतर अक्षय खन्नानं नेहमीप्रमाणे झगमगाटापासून दूर राहणे पसंत केले.

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अक्षय खन्नाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी कायम उत्सुक असतात.

अक्षय खन्ना आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तो ५१ वर्षांचा झाला आहे. २८ मार्च १९७५ रोजी अक्षय खन्नाचा जन्म झाला होता.

बॉलिवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी विनोद खन्नानं आपल्या कारकिर्दीत बॉर्डर, ताल, दिल चाहता है, हंगामा, हमराज, गांधी माय फादर यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक झालं. पण, २०१० मध्ये अक्षय खन्नानं चित्रपटांमधून चार वर्षांचा ब्रेक घेतला आणि २०१२ मध्ये पुन्हा पदार्पण केलं.

आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये, अक्षय खन्नानं उत्कृष्ट कामगिरी केली आणि डिशूम, इत्तेफाक, छावा आणि दृश्यम २ यांसारख्या चित्रपटांमुळे तो घराघरात पोहोचला.

करिअरप्रमाणेच त्याचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं आहे. एवढ्या मोठ्या कारकिर्दित अक्षयचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. करिश्मा कपूर, ऐश्वर्या राय, श्रिया सरन, श्रिया सरन, तारा शर्मा, उर्वशी शर्मा यांची नावे आहेत.

विशेष म्हणजे, इतक्या वर्षांनंतरही अक्षय खन्ना अजून अविवाहित आहे. एका मुलाखतीत त्याने स्वतः यामागचं कारण सांगितलं होतं.

अक्षय खन्नानं काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो कधीही लग्न करणार नाही. त्याला कमिटमेंटची भीती वाटते आणि त्याला आपलं आयुष्य एकट्यानं जगायचं आहे. त्यामुळेच त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

अक्षय खन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'महाकाली' (Mahakali), 'सेक्शन ८४' आणि 'इक्का' (Ikka) सह अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.