दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंगला तुमच्या लग्नात बोलवायचंय? मोजावे लागतील 'इतके' पैसे

By देवेंद्र जाधव | Updated: October 7, 2025 16:48 IST2025-10-07T16:38:33+5:302025-10-07T16:48:09+5:30

लग्नात शाहरुख, अक्षय, सलमानला बोलवायची इच्छा आहे? जाणून घ्या हे सेलिब्रिटी किती फी घेतात

प्रत्येक चाहत्याचं स्वप्न असतं की, त्यांच्या लग्न समारंभाला एखाद्या बॉलिवूड सुपरस्टारने हजेरी लावावी. तुम्हालाही तुमच्या लग्नाला कोणत्या बॉलिवूड सुपरस्टारला बोलवायचं असेल तर त्यांची फी जाणून घ्या

Siasat.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार रोमान्स किंग शाहरुख खानला (Shah Rukh Khan) खाजगी कार्यक्रमात बोलवायचं असेल तर तो सुमारे ३ कोटी रुपये फी घेतो.

काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झालेले रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे लग्न समारंभात हजेरी लावण्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये फी घेतात.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) खाजगी कार्यक्रमातील उपस्थितीसाठी २ कोटी रुपये घेतो. त्याची पत्नी, अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही यासाठी १.५ कोटी रुपये इतकी फी घेते.

बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये सर्वात तगडं मानधन घेते ती म्हणजे कतरिना कैफ. कतरिना कैफ कोणत्याही सोहळ्याला हजेरी लावायची असेल तर तब्बल ३.५ कोटी रुपये आकारते.

हृतिक रोशन देखील खाजगी समारंभात डान्स परफॉर्मन्ससाठी २.५ कोटी रुपये घेतो, तर भाईजान सलमान खानची फी २ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.

आपल्या दमदार अभिनयासाठी आणि एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) एका लग्नात परफॉर्म करण्यासाठी २.५ कोटी रुपये चार्ज करतो.