रात्री जेवताना फक्त 'ही' एक गोष्ट करा आणि फरक बघा! ५७ वर्षांच्या अक्षय कुमारने सांगितलं फिटनेस रहस्य

By देवेंद्र जाधव | Updated: August 22, 2025 10:28 IST2025-08-22T10:12:08+5:302025-08-22T10:28:37+5:30

अक्षय कुमार हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता. अक्षय कुमारने त्याच्या फिटनेसचं खास रहस्य सर्वांना सांगितलं आहे

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षय आता ५७ वर्षांचा आहे पण आजही तो फिट अँड फाईन आहे. अक्षयने त्याच्या फिटनेसचं सीक्रेट सर्वांना सांगितलं आहे.

अक्षय कुमार शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असेल तरीही दररोज रात्री १० ला झोपायचा प्रयत्न करतो. याशिवाय संध्याकाळी सातच्या आत अक्षय जेवतो.

‘युअर बॉडी ऑलरेडी नोज' या कार्यक्रमात अक्षयने फिटनेससाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, "रात्रीचं जेवण लवकर केलंच पाहिजे. हे तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं." असं तो म्हणाला

रात्री आपलं शरीर आराम करतं. आपले पायही, हात सर्व अवयव रात्री थकलेले असतात. त्यामुळे रात्री पोटालाही आराम देणं गरजेचं आहे, असं अक्षय म्हणाला.

याशिवाय मी आठवड्यातलं शेवटचं मील रविवारी खातो. सोमवारी उपवास करतो. त्यानंतर मंगळवार सकाळपर्यंत मी काही खात नाही, असं अक्षय म्हणाला.

मी फिट राहण्यासाठी कोणतंही वजन उचलत नाही. मी भरपूर खेळतो. ट्रेकला जातो. माझ्या जीममध्ये कोणतंही वजन ठेवलं गेलं नाही. मी तिथे फक्त लटकत असतो.

अशाप्रकारे जास्तीत जास्त शारीरिक हालचाली करुन अक्षय कुमार स्वतःला फिट ठेवतो. फिट राहण्यासाठी जिममध्ये जाऊन वजन उचलायची गरज नाही, असं अक्षय म्हणाला