IN PICS : 300 कोटींच्या ‘Prithviraj’साठी अक्षय कुमारनं घेतलं तगडं मानधन, वाचा किती आहे आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 05:19 PM2022-05-11T17:19:32+5:302022-05-11T17:28:20+5:30

Prithviraj : ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाची स्टारकास्ट तुम्हाला ठाऊक आहेच. पण या स्टारकास्टनं या चित्रपटासाठी घेतलेलं मानधन माहितीये का?

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट तुम्हाला ठाऊक आहेच. पण या स्टारकास्टनं या चित्रपटासाठी घेतलेलं मानधन माहितीये का?

अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तो पृथ्वीराज ही मध्यवर्ती भूमिका जिवंत करणार आहे. या चित्रपटासाठी अक्षयनं मोजून 60 कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.

पृथ्वीराज या चित्रपटामधून मानुषी छिल्लरचा बॉलिवूड डेब्यू होतोय. या या चित्रपटामध्ये तिने संयोगिता ही भूमिका साकारली आहे. या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी मानुषीनं किती मानधन घेतलं माहितीये? तर 1 कोटी.

पृथ्वीराज या चित्रपटामध्ये अभिनेता मानव विज हो मोहम्मद गोरीची भूमिका साकारतोय. ही भूमिका साकारण्यासाठी त्याने 10 लाख मानधन घेतल्याचं कळतंय.

संजय दत्तने या चित्रपटात काका कान्हाची भूमिका जिवंत केली आहे. ट्रेलरमध्ये त्याची छोटी झलक तुम्ही पाहिलीच. रिपोर्टनुसार,या भूमिकेसाठी संजयनं 5 कोटी मानधन घेतलं आहे.

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं पृथ्वीराज चित्रपटामध्ये चंद्रवरदाई ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील सोनूच्या लुकची सध्या जोरदार चर्चा आहे. अर्थात मानधनाचा आकडाही कमी नाही. या चित्रपटासाठी त्याने 3 कोटींचं मानधन घेतल्याचं समजतंय.

आता या चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलू या. तर या पीरियड ड्रामावर सुमारे 300 कोटींचा खर्च झाला आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे तर यश राज फिल्म्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.