'या' अभिनेत्यानं फक्त ८ मिनिटांच्या कॅमिओसाठी घेतले ३५ कोटी, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:52 IST2025-06-15T17:45:01+5:302025-06-15T17:52:10+5:30
रोल फक्त ८ मिनिटांचा आणि मानधन घेतलं ३५ कोटी!

दक्षिण असो वा बॉलिवूड निर्माते हे चित्रपटात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत राहतात. प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी सिनेमात एखाद्या लोकप्रिय कलाकाराचा कॅमिओ असणं तर सामान्य झालं आहे. काही कलाकार कॅमिओसाठी १ रुपयेही घेत नाहीत, तर काही असे आहेत, जे फक्त ५-१० मिनिटांच्या कॅमिओ मोठं मानधन घेतात.
बॉलिवूडचा असाच एक अभिनेता आहे, ज्यानं फक्त ८ मिनिटांच्या कॅमिओसाठी प्रति मिनिट ४.३५ कोटी रुपये घेतले होते.
शाहरुख खान, सलमान खान, अल्लू अर्जुन, रजनीकांत आणि प्रभास एका चित्रपटासाठी कोटी रुपये घेतात. परंतु या बॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या छोट्या कॅमिओसाठी कोटी रुपये घेत सर्वांना धक्का दिला होता.
तो अभिनेता आहे अजय देवगण (Ajay Devgn). एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. त्याच वेळी आलिया भट आणि अजय देवगण यांचा कॅमिओ होता.
वृत्तानुसार, या चित्रपटात अजय देवगणचा ८ मिनिटांचा कॅमिओ होता. ज्यासाठी त्याने ३५ कोटी घेतले होते. म्हणजेच प्रत्येक मिनिटाला ४.३५ कोटी रुपये आकारले.
कोविडनंतरही अजय देवगणने सातत्याने अनेक मोठे चित्रपट दिले आहेत. काही फ्लॉप सिनेमे देऊनही त्याची मागणी कमी झालेली नाही. यामुळेच त्याने 'रेड २' आणि 'औरों में कहां दम था' सारख्या चित्रपटांसाठी २० कोटी मानधन घेतलं.
त्याचवेळी, 'सिंघम अगेन' सारख्या मोठ्या चित्रपटासाठी त्याने ४० कोटी रुपये घेतले. २०२१ मध्ये तो ओटीटीवरील सर्वात महागडा अभिनेता ठरला होता. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' साठी अजय देवगनने जवळपास १२५ कोटी रुपये मानधन घेतले.
अजय देवगणने १९९१ मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. त्याच्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु हिट चित्रपटांसोबतच त्याने ४६ फ्लॉप चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये अनेक मोठे बजेट चित्रपट देखील समाविष्ट आहेत.