या सुप्रसिद्ध कलाकारांचं मूळ नाव माहितीये का? एकीने चक्क ज्योतिषाचं ऐकून नावात केला बदल
By देवेंद्र जाधव | Updated: March 20, 2025 16:56 IST2025-03-20T15:40:38+5:302025-03-20T16:56:22+5:30
Bollywood Actors Who Changed Names: हे सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकार आज लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरीही या कलाकारांंचं मूळ नाव वेगळंच आहे ज्याविषयी ९९ % लोकांना माहित नसेल

अनेकांना ठाऊक नसेल पण अजय देवगणचं मूळ नाव वेगळं आहे. विशाल वीर देवगण हे अजयचं मूळ नाव आहे. इंडस्ट्रीत येण्याआधी अजयने नावात बदल केला
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी विविध भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये राज्य केलं. दिलीप कुमार यांचं मूळ नाव मोहम्मद युसुफ खान असं होतं. परंतु नंतर त्यांनी दिलीप कुमार हे नवीन नाव ठेवलं
चिरतरुण अभिनेते जितेंद्र यांचं मूळ नाव वेगळं आहे. जितेंद्र यांचं मूळ नाव रवी कपूर असं आहे.
अक्षय कुमारचं मूळ नाव वेगळंच आहे याविषयी आता अनेकांना माहित असेल. राजीव भाटिया असं अक्षयचं मूळ नाव असून अभिनेता बनण्यापूर्वी अक्षयने नावात बदल केला.
शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. शिल्पाचं मूळ नाव आधी अश्विनी होतं. परंतु एका ज्योतिषाने दिलेल्या सल्ल्यानुसार शिल्पाने नावात बदल केला.
अॅक्शन आणि डान्ससाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा लेक टायगरचं मूळ नाव हेमंत श्रॉफ असं होतं.
बॉलिवूडसह सध्या साऊथ इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी. कियाराचं मूळ नाव आलिया होतं. परंतु आलिया भट त्यावेळी आधीच लोकप्रिय असल्याने आलिया हे नाव बदलून अभिनेत्रीने कियारा हे नाव ठेवलं.