IN PICS : 30 सिनेमे नाकारले, मग अक्षय कुमारसोबत केला धमाका, निमरत कौरचा फिल्मी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:00 AM2021-03-13T08:00:00+5:302021-03-13T08:00:01+5:30

लंचबॉक्स, एअरलिफ्ट या सिनेमाद्वारे आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री निरमत कौर हिचा आज वाढदिवस

लंचबॉक्स, एअरलिफ्ट या सिनेमाद्वारे आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री निरमत कौर हिचा आज वाढदिवस आहे. तेव्हा जाणून घ्या तिच्याबद्दल काही खास गोष्टी...

13 मार्च 1982 रोजी राजस्थानच्या पिलानी येथे निरमतचा जन्म झाला होता.

निरमतचे वडील मेजर भूपिंदर सिंह हे लष्करात होते. त्यामुळे त्यांची सतत बदली व्हायची. साहजिकच निमरतचे बालपण वेगवेगळ्या शहरात गेले. अरुणाचल, पटियाला, बठिंडा या शहरांत ती खूप काळ राहिली.

केवळ आवड म्हणून थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘ऑल अबाऊट वुमन’ या एका नाटकात निमरतने 25 ते 85 वयाच्या महिलेच्या भूमिका साकारल्या होत्या.

मात्र नंतर तिने अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत येऊन तिने अनेक ऑडीशन्स दिल्या.

सोनीच्या ‘तेरा मेरा प्यार’ या अल्बममध्ये निरमतने काम केले होते. हा अल्बम हिट ठरला आणि निमरतचा चेहरा प्रकाशझोतात आला.

असे म्हणतात की, निमरतने पहिल्या सिनेमासाठी 27-28 सिनेमे रिजेक्ट केले होते. तिचा पहिला सिनेमा ‘पेडलर्स’ होता.

यानंतर ती इरफान खानसोबत ‘लंचबॉक्स’मध्ये दिसली. यानंतर अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’ सिनेमात तिचा दमदार अभिनय पाहायला मिळाला.

निमरतच्या वडिलांचे हिज्बुल मुजाहिदच्या अतिरेक्यांनी अपहरण केले होते. यातच ते शहीद झाले. त्यांना मरणोत्तर शौर्यचक्राने गौरविण्यात आले होते.