सनी लिओनीनंतर आता कियारा आडवाणीनेदेखील केले टॉपलेस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 21:53 IST2021-06-17T21:42:57+5:302021-06-17T21:53:53+5:30
कियारा आडवाणीने नुकतेच डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले आहे.

सनी लिओनीने नुकतेच डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले होते. त्यानंतर आता कियारानेदेखील टॉपलेस फोटोशूट केले आहे.
कियारा आडवाणीने नुकतेच डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले असून तिने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
कियारा आडवाणीने पुन्हा एकदा आपल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट असून यावेळी तिने वाळूत फोटोशूट केले आहे.
कियारा आडवाणीचा ग्लॅमरस चाहत्यांना खूप भावला आहे.
कियाराच्या या टॉपलेस फोटोने फक्त चाहत्यांचेच नाही तर सेलिब्रेटींचेही लक्ष वेधून घेतले आहे.
कियाराच्या या फोटोवर आलिया भटने वॉव अशी कमेंट केली आहे.
अभिनेता दर्शन कुमारनेही तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.
कियारा आडवाणी जुग जुग जियो चित्रपटात झळकणार आहे.
याशिवाय ती रणवीर सिंगसोबत एका प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.