नव्या फोटोशूटमध्ये अदिती राव हैदरी दिसतेय क्लासी, चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 01:33 PM2024-06-11T13:33:17+5:302024-06-11T13:47:20+5:30

अभिनेत्री अदिती राव हैदरी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत.

अदिती राव हैदरी कायम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

आता पुन्हा एकदा अदिती राव हैदरीने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

या फोटोंमध्ये अदिती राव हैदरी अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.

व्हाईट रंगाच्या आऊटफीटवर अदिती राव हैदरीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.

अदितीचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. सध्या आदितीच्या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत.

अदिती तिच्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

नुकतेच अदिती ही संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

या सीरीजमध्ये बिब्बोजान हे पात्र अत्यंत सुंदररित्या तिनं साकारलं. 'हीरामंडी'मध्ये तिने केलेला "गजगामिनी" वॉकला प्रेक्षकांनी पसंती दिली.