आईच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्रीचा ५१ व्या वर्षी बिकिनी लूक! मालदीवमध्ये करतेय एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:55 IST2025-03-21T12:36:08+5:302025-03-21T13:55:15+5:30
अभिनेत्रीच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

मनोरंजनविश्वात अभिनेत्रींना कायम फिट राहावं लागतं. सतत फ्रेश दिसण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागते.
वयाच्या ५१ व्या वर्षी एका अभिनेत्रीने गुलाबी बिकिनीतील फोटो शेअर करत धुमाकूळ घातला आहे. तिचा हा लूक पाहून चाहते अवाक झालेत.
ही अभिनेत्री आहे टिस्का चोप्रा (Tisca Chopra). 'तारे जमीन पर' सिनेमात ईशानच्या आईच्या भूमिकेत दिसलेली हीच ती अभिनेत्री.
टिस्का चोप्रा कुटुंबासोबत मालदीवला व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिने या व्हॅकेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
मालदीवच्या निळ्याशार समुद्राच्या पाण्यातून ती गुलाबी बिकिनी घालून बाहेर येताना दिसते. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांना कमालीचं आश्चर्य वाटत आहे. याही वयात तिचा हा अंदाज लक्षवेधी आहे.
मालदीवच्या शांत वातावरणात टिस्का रमली आहे. शहरात असा अनुभव येत नाही. इथेच राहावं वाटत असल्याची भावना तिने कॅप्शनमधून मांडली आहे.
टिस्का कुटुंबासोबत मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे. पती आणि लेकीसोबत तिने फोटो शेअर केले आहेत.
टिस्काचे इन्स्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचा वेगळा चाहतावर्ग आहे.