PHOTO: सई मांजरेकरचं नवं फोटोशूट चर्चेत; नेटकरी झाले क्लिन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:40 IST2024-11-14T16:31:48+5:302024-11-14T16:40:11+5:30

अभिनेत्री सई मांजरेकरने सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.

सई नेहमी तिचे नवनवीन फोटोशूट चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

नुकतेच सईने जांभळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान करून फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी नेटकऱ्यांना घायाळ केल्याचं पाहायला मिळतंय.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या फोटोशूटची चर्चा होताना दिसतेय.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने सलमान खानच्या 'दबंग ३' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

आपल्या डेब्यू सिनेमातूनच तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. शिवाय प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.