आई रंभा तर मुली दिसायला उर्वशी, मेनका! लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकींना पाहिलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:15 IST2025-06-20T15:06:06+5:302025-06-20T15:15:18+5:30
सलमानची 'जुडवा' मधील हिरोईन रंभा आठवतेय का? तिच्या लेकीही दिसतात सुंदर

सलमान खानच्या 'जुडवा' सिनेमात झळकलेली अभिनेत्री रंभा (Rambha) आठवतेय? करिश्मा कपूरच्या जोडीला ती मुख्य अभिनेत्री होती.
रंभाने तमिळ, तेलुगु, मल्याळम, भोजपुरी आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये काम करत अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिने आपल्या सौंदर्याने सर्वांना प्रेमात पाडलं होतं.
२०१० मध्ये रंभाने तमिळ व्यावसायिक इंद्रकुमार पद्मनाथन यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर ती परदेशात स्थायिक झाली. रंभा आज ४९ वर्षांची असून तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे.
रंभाप्रमाणेच तिच्या दोन्ही मुलीही दिसायला काही कमी सुंदर नाहीत. दोघीही सध्या लहान आहेत.
२०१२ मध्ये तिने पहिल्या मुलीला जन्म दिला. तिचं नाव लावण्या आहे. रंभाची थोरली लेक लावण्या दिसायला आईसारखीच सुंदर आहे. ती १३ वर्षांची आहे.
तर रंभाची धाकटी लेक साशा ही १० वर्षांची आहे. रंभाने आपल्या दोन्ही मुलींसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.
तसंच तिला एक मुलगाही आहे. २०१८ मध्ये तिने शिविनला जन्म दिला. रंभा कुटुंबासोबत टोरंटोमध्ये वास्तव्यास आहे. रंभी मधल्या काही काळात टीव्ही शोमध्ये परीक्षक म्हणून दिसली.