तेलाच्या कंपनीत काम करायची 'ही' नायिका! प्रियंका चोप्रासोबत केलं काम, १८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:28 IST2026-03-20T16:06:29+5:302026-03-20T16:28:01+5:30

पेट्रोल पंपावर काम करायची मराठमोळी अभिनेत्री, प्रियंका चोप्रासोबत केला डेब्यू; बॉलिवूड अभिनेत्यासह १२ वर्षांपासून राहतेय लिव्ह-इनमध्ये

मुग्धाने तिचं शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून पूर्ण केलं. त्यानंतर वाणिज्य शाखेतील पदवी मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयातून संपादन केली. त्यावेळी घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने तिने एका तेलाच्या कंपनीचे मार्केटिंग सेल्सगर्ल म्हणूनही काम पाहिलं.

मुग्धाच्या कारकि‍र्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली. २००२ मध्ये तिने ग्लॅड्रेग्स मेगा मॉडेल हंट जिंकून मॉडेलिंग क्षेत्रात स्वतची वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर मुग्धाला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर येऊ लागल्या.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ती ‘कोका तेरा कोको’, मौजा लेन दे’, जब छाये मेरा जादू’,'लेकर हम दीवाना दिल' यांसारख्या अनेक हिंदी गाण्यांच्या अल्बममध्ये झळकली.

मधुर भांडारकर दिग्दर्शित फॅशन या चित्रपटातून मुग्धा यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २००८ मध्ये आलेल्या चित्रपटासाठी मुग्धाला या त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळालं.

त्यानंतर मुग्धाने 'ऑल द बेस्ट आणि जेल' ,'हेल्प’ गली गली चोर है,'विल यू मॅरी मी?' याशिवाय मुग्धाने ओ गॉड सारे है फ्रॉड , साहेब, बीबी और गॅगस्टर रिटर्न, सत्याग्रह , फूल ऑफ पेपर, लव्ह विथआऊट लिमिट, तामिळ चित्रपट थानी ओरुवन , शर्माची विश कम ट्रू , सोल्जर इज कॉलिंग यू , कॉफी, खेला होबे या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.

दरम्यान, मुग्धा तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. मुग्धा गोडसे गेल्या १२ वर्षांपासून एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय.मात्र,दोघांनी अद्याप लग्न केलेलं नसून त्यांचा तसा विचारही नाहीये.

विशेष म्हणजे मुग्धा आणि राहुल देवमध्ये वयाचं १८ वर्ष असं मोठं अंतर आहे.बॉसच्या १३ व्या सीझनमध्येही मुग्धा आणि तिचा प्रियकर अभिनेता राहुल देव हे पॉवर कपल या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले होते.