अभिनेत्री ममता कुलकर्णीला आता ओळखणं झालं कठीण, फोटो पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 08:00 AM2022-08-17T08:00:00+5:302022-08-17T08:00:00+5:30

Mamta Kulkarni:आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्यामुळे ममता कुलकर्णी एकेकाळच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामिल होती.

आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्यामुळे ममता कुलकर्णी एकेकाळच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामिल होती.

नव्वदच्या दशकात आपल्या लूक आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे अभिनेत्री ममता कुलकर्णी काही चित्रपटांनंतर टॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाली होती.

त्या काळातील अनेक चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाने आणि लूकने चाहत्यांना वेड लावले. मात्र, नंतर ती चित्रपटांमधून अचानक गायब झाली.

ती अचानक गायब झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. बऱ्याच वर्षांनंतर ममता कुलकर्णीचे फोटो समोर आले आहेत.

आता तिच्यात खूप बदल झाल्यामुळे ही तीच सुंदर अभिनेत्री ममता कुलकर्णी आहे हे ओळखणे लोकांना कठीण झाले.

रिपोर्ट्सनुसार, तिने तिचं करिअर अर्धवट सोडलं आणि ड्रग माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न केले आणि देश सोडून गेला. विक्की गोस्वामीमुळे ती चौकशीच्या घेऱ्यात आली होती.

ममता कुलकर्णी यांचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी एका मराठी कुटुंबात झाला होता.

नव्वदच्या दशकात, ती सैफ अली खानसोबत आशिक आवारा, क्रांतीवीर, सलमान खानसोबत करण अर्जुन, सबसे बड़ा खिलाडी यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली.