बाबो! ५०० कोटींची मालकीण आहे अभिनेत्री, दिग्गज घराण्याची लेक अन् रॉयल कुटुंबाची सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:06 IST2025-08-26T14:01:46+5:302025-08-26T14:06:02+5:30

अभिनेत्री वयाच्या ४४ व्या वर्षातही दिसते कमालीची सुंदर, प्रत्येक सिनेमाचे घेते १० ते १२ कोटी

मनोरंजनविश्वात कलाकार कोट्यवधींचे मालक असतात. सिनेमा, वेबसीरिज, ब्रँड्स आणि जाहिरातींमधून ते कोट्यवधींची कमाई करतात. त्यामुळे त्यांचं राहणीमानही आलिशान असतं.

अशीच एक अभिनेत्री जी दिग्गज घराण्याची मुलगी आणि रॉयल घराण्याची सून आहे. तिच्या कमाईचा आकडा वाचून तर डोळेच फिरतील.

तीनही खानसोबत काम करणारी, दिसायला सुंदर, तेजस्वी अशी ही अभिनेत्री आता ४४ वर्षांची आहे. दोन गोंडस मुलांची ती आई आहे. आजही अभिनेत्री एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे देत आहे.

ही अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan). करीनाला सिनेसृष्टीत २५ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. २००० साली आलेल्या 'रेफ्युजी' या सिनेमातून तिने आणि अभिषेक बच्चनने एकत्रच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

करीनाने सिनेसृष्टीत जवळपास सर्वच अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. मग ते तीन खान असो, किंवा सैफ अली खान, इमरान खान, अर्जुन कपूर, अजय देवगण, आणि अगदी विजय वर्मा, जयदीप अहलावत सोबतही ती दिसली आहे.

करीना कपूर सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती एका सिनेमासाठी तब्बल १० ते १२ कोटी घेते. शिवाय तिची नेटवर्थ वाचून तर तुमच्याही डोळ्यांचं पारणं फिटेल.

करीना ५०० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. कपूर घराण्याची ती मुलगी आणि पतौडींची सून आहे. २०१२ साली तिने सैफ अली खानशी लग्न केलं. तिला तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत.