सुपरस्टार अभिनेत्याचा लेक! एकेकाळी करायचा 'LIC' एजंटचं काम, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:14 IST2026-02-05T17:48:23+5:302026-02-05T18:14:32+5:30

वडील सुपरस्टार पण पडद्यावर फ्लॉप ठरला 'हा' अभिनेता, कामातून स्वत:ला केलं सिद्ध, त्याची गिनीज बुकमध्ये नोंद

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकचा आपल्या आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीत सक्रिय आहे.

आज या अभिनेत्याचा वाढदिवस आहे. अभिषेकचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ ला मुंबईत झाला.अभिषेकचं सुरुवातीचे शिक्षण मुंबईत जमनाबाई नरसी स्कूल व बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अभिषेक परदेशात गेला होता. स्वित्झर्लंडमधील आयग्लॉन कॉलेजमध्ये महाविद्यालय तसंच काही काळ त्याने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेतलं.

कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अभिषेक एक LIC एजंट म्हणून काम करत होता. खरं तर ही गोष्ट फार कमी जणांना माहित आहे. पण, अभिषेकने एका एलआयसी एजंटचंदेखील काम केलं आहे. मात्र, अभिनयाची आवड असल्यामुळे त्याची पावले कलाविश्वाकडे वळली.

अभिषेकने 2000 मध्ये जे.पी.दत्ता यांचा रिफ्युजी या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला पण प्रेक्षकांनी अभिषेक आणि करिना या जोडीला पसंती दिली.

त्यावेळेस अभिषेकने त्याला ऑफर केले गेलेले सगळेच चित्रपट सरसकट केले होते. अशावेळी स्क्रिप्टकडे लक्ष न देणे अभिषेकला करिअरच्या दृष्टिने खूप महागात पडले. यामुळे अभिषेक बच्चनने ४ वर्षात सलग १७ फ्लॉप चित्रपट दिले.

आपल्या अभिनय कारकिर्दीत त्याने 'तेरा जादू चल गया', 'ढाई अक्षर प्रेम के', 'बस इतना सा ख्वाब है', 'हा मैने भी प्यार किया है', यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मात्र, आपल्या करियरमध्ये यश पाहण्यासाठी २००४ साल उजाडावे लागले. मणिरत्नमच्या युवा या चित्रपटातून अभिषेकच्या अभिनय क्षमतेवर शिक्कामोर्तब तर झालेच पण चित्रपटही यशस्वी ठरला. त्यानंतर २००६ मध्ये आलेला कभी अलविदा ना कहना हा चित्रपट त्या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

दिल्ली ६’च्या दरम्यान तब्बल १२ तासांहून अधिक वेळासाठी पब्लिक अपियरंस आणि ‘पा’ चित्रपटातील रिव्हर्स भूमिकेमुळे अभिषेकचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले होते. या चित्रपटाचा निर्माता म्हणून अभिषेकला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. २०२० मध्ये ‘ब्रिथ इन टू द शॅडो या वेबसिरीजद्वारे त्याने ओटीटीच्या विश्वातही पाऊल ठेवलं. या वेबसिरीजमधील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.

वैयक्तिक आयुष्यात अभिषेक बच्चनचे गुरु या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या राय बच्चन सोबत सुत जुळले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर १४ जानेवारी २००७ ला साखरपूडा तर २० एप्रिल २००७ ला दक्षिण भारतीय पारंपारिक हिंदू रितीरिवाजानुसार लग्न संपन्न झाले. त्यानंतर उत्तर भारतीय आणि बंगाली पध्दतीनेही त्यांचे लग्न करण्यात आले. विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. त्यांना आराध्या नावाची एक मुलगी आहे.