फिटनेसमध्ये दडलेलं सौंदर्याचं रहस्य, शर्वरी वाघची 'अल्फा'साठी जोरदार तयारी, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 16:53 IST2024-10-22T15:31:45+5:302024-10-22T16:53:59+5:30
अभिनेत्री शर्वरी वाघचे बॅडमिंटन खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत (sharvari wagh)

मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. शर्वरी वाघ सध्या तिच्या आगामी सिनेमासाठी चांगलीच तयारी करताना दिसतेय
शर्वरी वाघ सध्या आलिया भटसोबत अल्फा सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हा सिनेमा आहे
शर्वरी वाघ या सिनेमात आलिया भटसोबत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी शर्वरी-आलियाने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता
शर्वरी वाघ सध्या या सिनेमासाठी जोरदार तयारी करताना दिसतेय. अलीकडेच शर्वरीने टेनिस खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते
शर्वरी वाघ टेनिस आणि बॅडमिंटन खेळांच्या माध्यमातून स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्याचा प्रयत्न करतेय
शर्वरी वाघ ही स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते. यावर्षी शर्वरीचे मुंज्या, महाराज आणि वेदा हे तीन सिनेमे रिलीज झाले
शर्वरी वाघ आणि आलिया भट अल्फा सिनेमातून काय जादू करणार याची सर्वांना उत्सुकता आहे