पहिल्याच चित्रपटातून झाली स्टार! प्रेमासाठी करिअरवर सोडलं पाणी, नवऱ्याला वाचवायला विकली १०० कोटींची मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 17:29 IST2026-03-26T17:22:28+5:302026-03-26T17:29:12+5:30
जुही चावलाची नातेवाईक आहे 'ही' सुप्रसिद्ध नटी! यशाच्या शिखरावर असताना सोडलेली इंडस्ट्री, नवऱ्यासाठी विकलं राहतं घर


‘जिसे देख मेरा दिल धडके, मेरी जान तरसती है’ या फुल और कांटे चित्रपटातील गाणे आठवले की आठवते अभिनेत्री मधू. अजय देवगण आणि मधु यांचा हा पहिलाच चित्रपट होता आणि या चित्रपटाच्या यशाने त्यांना एका रात्रीत सुपरस्टार झाली.आज अभिनेत्री मधुचा जन्मदिवस आहे.

हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्री मधुला 'फूल और कांटे','रोजा','अल्लारी प्रियुडू', 'योध्दा' आणि 'जेंटलमॅन' या गाजलेल्या चित्रपटांसाठी आजही ओळखली जाते.

बालाचंदर दिग्दर्शित 'अझगन' (१९९१) या तामिळ चित्रपटातून तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने 'फूल और कांटे' या चित्रपटातून अजय देवगणसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

वैयक्तिक आयुष्यात एका फोटोशूटदरम्यान भेटलेल्या अमेरिकेतील व्यावसायिक आनंद शाह यांच्याशी १९ फेब्रुवारी १९९९ ला मधु यांनी विवाह केला. या दाम्पत्याला अमाया व केया या दोन मुली आहेत. आनंद शाह हे अभिनेत्री जुही चावला यांचे पती जय मेहता यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे मधु यांचे जुही चावला यांच्याशीही नाते जुळले. विवाहानंतर मधु यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला विराम दिला.

काही कालावधीनंतर बँकेच्या कर्जाने त्यांचे पती आनंद शाह यांचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला. त्यावेळी मधु यांनी आपले वडिलोपार्जित मिळालेले घर विकून आनंद शाह यांचे कर्ज फेडण्यासाठी १०० करोड रुपयांची मदत केली होती. चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकिर्दीला पुन्हा सुरु करत 'कभी सोचा भी ना था' (२००८) या चित्रपटाने पुर्नपर्दापण केलं.

चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकिर्दीला पुन्हा सुरु करत 'कभी सोचा भी ना था' (२००८) या चित्रपटाने पुर्नपर्दापण केलं. त्यानंतर २०११ मध्ये मधु यांनी लव यू मिस्टर कलाकार हा चित्रपट केला. मात्र हा चित्रपट यश मिळवू शकला नाही. त्यामुळे त्यांनी चांगल्या भूमिकेची प्रतीक्षा करण्याचे ठरवले. २०२१ मध्ये कंगना राणावत यांच्या थलावयी या अभिनेत्री व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात मधु यांनी एमजीआर रामचंद्रन यांची पत्नी जानकी रामचंद्रनची भूमिका केली होती.

सध्या अभिनेत्री तिच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त असून, पती व मुलींसोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते.

















