घाऱ्या डोळ्यांची नायिका! सौंदर्य स्पर्धेतून आली अन् बॉलिवूड गाजवलं, ऑस्ट्रेलियन उद्योजकाशी लग्न करून झाली गायब, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:12 IST2025-11-25T18:07:37+5:302025-11-25T18:12:46+5:30

सौंदर्य स्पर्धेतून आली अन् बॉलिवूड गाजवलं, ऑस्ट्रेलियन उद्योजकाशी लग्न करून झाली गायब,पण...

सौंदर्य स्पर्धांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या अभिनेत्रींमध्ये काही गाजल्या तर काहींच्या नशीबी अपयश आलं. त्यातील एक नाव म्हणजे सेलिना जेटली.

पंजाबी हिंदू वडील कर्नल विक्रम कुमार जेटली आणि मानसशास्त्र आणि साहित्याची प्राध्यापिका असणारी ख्रिश्चन आई मीता फ्रान्सिस यांच्या कुटुंबात तिचा जन्म झाला.

२००१ मध्ये मिस इंडिया किताब जिंकणारी व मिस युनिव्हर्स २००१ मध्ये चौथी उपविजेती ठरलेल्या अभिनेत्री सेलिना जेटलीची एकेकाळी इंडस्ट्रीत चलती होती. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.

२००३ मध्ये आलेल्या जानशीन या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर चित्रपटसृष्टीची दारे तिच्यासाठी खुली झाली. सेलिनाने तिच्या कारकि‍र्दीत अपना सपना मनी मनी, गोलमाल रिटर्न्स, थॅंक्यू अशा चित्रपटातून झळकत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं.

वैयक्तिक आयुष्यात सेलिनाने ऑस्ट्रेलियन उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक पीटर हॅग यांच्याशी विवाह केला. घारे डोळे आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या या नायिकेने इंडस्ट्रीपासून अंतर ठेवलं.

मार्च २०१२ या दाम्पत्याला जुळी मुले झालीत. यातील एका मुलाचा जन्मानंतर काही काळातच हृदयविकाराने मृत्यू झाला.

सध्या ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. सेलिनाने पतीवर कौटुंबिक हिंसाचार, क्रूरता, शारिरीक, मानसिक छळाचा आरोप केला आहे. सेलिनाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टाने ऑस्ट्रियाचा नागरिक पीटर हागला नोटीस पाठवली आहे. यामुळेच तिला ऑस्ट्रियातील घर सोडून भारतात यावं लागलं.या सगळ्यात आता सेलिना घटस्फोटामुळे चर्चेत आहे.