Ankita Lokhande Photos: “सच्चा प्यार वही, जिसमें दोनो..;” अंकिता लोखंडेची पोस्ट चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 18:26 IST2022-04-20T18:17:48+5:302022-04-20T18:26:47+5:30
Ankita Lokhande Photos: अंकिता लोखंडेनं सोशल मीडियावर आपले काही फोटोस शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत.

Ankita Lokhande Photos Social Media: टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपली जबरदस्त ओळख निर्माण करणाऱ्या अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. ती अनेकदा तिचा पती विकी जैनसोबत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. नेटकऱ्यांकडूनही या जोडप्याच्या फोटोंना चांगली पसंती मिळताना दिसते.
नुकतेचं अंकितानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर काही फोटोस शेअर केले आहे. यात तिनं आपल्या पतीवर प्रेम व्यक्त तेसं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
अंकिता लोखंडेला पवित्र रिश्ता या मालिकेमुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तिनं या मालिकेत अर्चना ही भूमिका साकारली होती. काळ्या रंगाच्या साडीमध्ये अंकिता अतिशय सुंदर दिसत असून ती या फोटो पतीसोबत ट्विनिंग करताना दिसली. ब्लॅक बनारसी साडीतील तिचा लूक अतिशय सुंदर दिसत आहे.
अंकिता लोखंडेनं शेअर केलेल्या फोटोंमधून जोडप्यातील प्रेम दिसून येत आहे. तसंच अंकितानं याला “सच्चा प्यार वही है जिसमे दोनों ही एक दूसरे को खोने से डरते” असं कॅप्शनही दिलं आहे.
अंकिता आणि विकी जैन यांचे फोटो पाहून भाग्यश्रीही स्वत:ला रोखू शकली नाही. तिनं दोघांच्या फोटोवर कमेंट करत देव तुम्हाला आशीर्वाद देओ असं लिहिलं आहे.
गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी अंकिता लोखंडे आणि विकी जैन विवाहबंधनात अडकले. त्यांच्या विवाह सोहळ्यात कुटुंबीयांसह काही मित्रपरिवारही सामील झाला होता.
अंकिता आणि विकी जैन काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी २०१८ मध्ये आपल्या रिलेशनशीपबद्दल सांगितलं होतं.
अंकितानं दिलेलं कॅप्शन सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. सध्या ही जोडी एक स्मार्ट जोडी म्हणून प्रसिद्ध आहे. (सर्व फोटो - अंकितो लोखंडे, इन्स्टाग्राम)