अंकिता वालावलकरच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:28 IST2025-02-14T17:26:00+5:302025-02-14T17:28:39+5:30
अंकिताच्या हातावर कुणालच्या नावाची मेहंदी सजली आहे.

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरातून पोहोचलेली अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
काल, १३ फेब्रुवारीपासून तिच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. अंकिताचा काल मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.
तिच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो व्हायरल होत आहेत.
अंकितानं मेहेंदी सोहळ्यासाठी अंकिता आणि कुणालने ट्विनिंग केलं होतं. दोघेही खूपच सुंदर दिसत होते.
अंकिताने मॅचिंग कानातले घालून तिचा मेहंदी लूक पूर्ण केला.
अंकिता आणि कुणाल दोघेही कोकणात मोठ्या थाटामाटात देवबागमध्ये लग्न करणार आहेत.
माहितीनुसार, आज १५ फेब्रुवारीला अंकिताचा साखरपूडा होईल आणि त्यानंतर हळद लागणार आहे.
तर १६ फेब्रुवारीला अंकिता कुणालशी लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.
अंकिता आणि कुणाल दोघेही प्रचंड आनंदी असल्याचं दिसून येत आहे. दोघांवर चाहत्यांनी प्रेमांचा वर्षाव केलाय.
अंकिता वालावलकरचा होणारा नवरा कुणाल भगत हा लोकप्रिय संगीतकार आहे. बऱ्याच चित्रपटातील गाणी आणि मालिकांचं शीर्षकगीत त्याने संगीतबद्ध केली आहे