अवनीत कौरने ब्लू डेनिम आउटफिटमधून वेधून घेतले सर्वांचे लक्ष, दिसली खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 11:10 IST2021-02-20T11:10:37+5:302021-02-20T11:10:37+5:30

अवनीत कौर एक भारतीय अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिचा जन्म १३ ऑक्टोबर, २००१ मध्ये जालंधर पंजाबमध्ये झाला होता.
नुकतेच अवनीत कौरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.
या फोटोत अवनीत कौर ब्लू डेनिम आउटफिटमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
अवनीत कौरने करिअरची सुरूवात डान्स इंडिया डान्समध्ये स्पर्धक म्हणून केली होती. याशिवाय ती डान्स के सुपरस्टारमध्येही झळकली होती.
अवनीतने अभिनयात मालिका मेरी मांमधून पदार्पण केले होते. या मालिकेत तिने झिलमिलची भूमिका केली होती.
त्यानंतर ती डान्स रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये दिसली होती.
अवनीत कौरने मालिकेशिवाय जाहिरातीतही काम केले आहे.
अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तिचे इंस्टाग्रामवर १६.८ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.