Bride-To-Be : गर्ल गँगसोबत धम्माल रंगली अंकिता लोखंडेची बॅचलर पार्टी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:56 IST2021-11-17T15:34:25+5:302021-11-17T15:56:49+5:30

Ankita Lokhande's Bachelorette Party : अंकिताच्या लग्नाचं काउंटडाऊनही सुरू झालं आहे ... बोहल्यावर चढण्याआधी अंकिताच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास बॅचलर पार्टीचं आयोजन केलं होतं...

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच तिचा बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे आणि प्री-वेडिंग सेरेमनी सुरू झालीये.

लग्नाच्या आधी काल रात्री रंगली तर अंकिताची बॅचलर पार्टी. या पार्टीचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये सना मकबूल, अपर्णा दीक्षिता, मृणाल ठाकूर, रश्मी देसाई, अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे अशा सगळ्याजणी अंकिताच्या बॅचलर पार्टीत सामील झाल्या आणि मग धम्माल मस्ती रंगली.

‘ब्राईड टू बी’अंकिता मरून कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पार्टीसाठी आली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

हॉटेलबाहेर फोटोग्राफर्सला अंकिताने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्यात. यावेळी ती प्रचंड ग्लॅमरस दिसत होती.

पार्टीत अंकिताने ट्रेंडी केक कापला. मग धम्माल डान्स झाला. एकंदर अंकिताने पार्टीचा मनमुराद आनंद घेतला.

रिपोर्टनुसार, अंकिता 12 डिसेंबरला विकीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तीन दिवस हा लग्नसोहळा चालणार आहे.

अंकिताच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार असल्याचीही खबर आहे. यातले एक नाव रॅपर बादशहाचेही आहे.

अंकिता व विकी जैन दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

विकी जैन आधी ती बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

Read in English