'पण विसरणे सुद्धा अशक्य होईल...', अंकिता लोखंडेच्या फोटोंनीच नाही तर कॅप्शनही वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 13:19 IST2021-12-25T11:48:21+5:302021-12-25T13:19:23+5:30

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत 7 फेऱ्या घेऊन नात्याला नवीन नाव दिले आहे. विकी आणि अंकिता 14 डिसेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. (Photo Instagram)

लग्नाच्या फोटोंनंतर अंकिताने काही नवीन फोटो शेअर केले आहेत. यातील तिच्या मराठमोळ्या ट्रेडिशनल लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.(Photo Instagram)

पिवळी नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, नकात नथ आणि केसात माळलेला गजरा अंकिता लग्नात टीपिकल महाराष्ट्रीयन नववधू बनलेली दिसेतय. (Photo Instagram)

हे फोटो शेअर करताना,खुबी माझ्यात एवढी नाही की, एखाद्याच्या मनात घर करून जाईन, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल, इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन. असे कॅप्शन दिले आहे. (Photo Instagram)

विकी जैन प्रसिद्ध उद्योगपती असून तो गुजराती असला तरी लग्नाचे सर्व विधी महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडले. . (Photo Instagram)

अंकिताच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स येतायेत. . (Photo Instagram)

अंकिताच्या संगीतपासून ते लग्नापर्यंत सर्व विधींना बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.(Photo Instagram)

अंकिता छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिच्या अभिनयाने तिने सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(Photo Instagram)

अनेकांनी अंकिता आणि विकी यांना महागडी गिफ्टस लग्नाची भेट म्हणून दिली. (Photo Instagram)