बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे अंबानींची सून; संजय दत्तसोबत होतं अफेअर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 12:41 IST2021-10-21T12:31:51+5:302021-10-21T12:41:20+5:30
Tina ambani : १९८१ मध्ये त्यांनी रॉकी चित्रपटात संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याकाळी संजय दत्तसोबतच्या त्यांच्या अफेअरच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या.

अंबानी हे नाव भारतासह जगभरातील कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अमाप संपत्ती असलेलं हे कुटुंब कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतं.

अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. अगदी या कुटुंबातील मुली, सूना यांचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते.

अंबानी कुटुंबाची सून निता अंबानी यांच्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, त्यांची जाऊबाईंविषयी फार कमी जणांना माहित आहे. निता अंबानींची जाऊ प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

रिलालन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी साऱ्यांनाच ठावूक आहे. विशेष म्हणजे टीना अंबानी या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

टीना अंबानी यांचं लग्नापूर्वीचं नाव टीना मुनीन असं असून त्यांनी १९७०-८० चा काळ गाजवला आहे.

१९७५ साली त्यांनी फेमिना टीन प्रिंसेस इंडियाचा खिताब जिंकला होता. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी देव आनंद यांच्या देश परदेस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

टीना यांनी लूटमार, मनपसंद या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

१९८१ मध्ये त्यांनी रॉकी चित्रपटात संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याकाळी संजय दत्तसोबतच्या त्यांच्या अफेअरच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या.

टीना यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

अनिल आणि टीना यांच्या लग्नसोहळ्यातील एक खास फोटो

अनिल व टीना यांना दोन मुलं आहेत.

















