Birthday Special : अमृताचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही करेल क्लीन बोल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 15:52 IST2018-11-23T15:42:46+5:302018-11-23T15:52:29+5:30

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर.
आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा असतात.
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रिअॅलिटी शो नच बलियेचे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे.
या फोटोत तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल...
अमृताच्या साडी लूकची रसिकांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अंगी असलेल्या अभिनेत्री अमृताने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत.
या फोटोमधील अमृताचे स्मित हास्य असणारे फोटो आणि हॉट अंदाजातील फोटो कुणालाही घायाळ करतील.