'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:44 IST2025-08-25T16:08:43+5:302025-08-25T16:44:36+5:30

Ahsaas Channa my friend Ganesha Actor glamorous photos : बॉलिवूडच्या अनेक सिनेमात मुलाचे पात्र साकारणारी खरी तर एक मुलगी आहे. वाचा तिच्याबद्दल...

सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे. 'माय फ्रेंड गणेशा' या हिंदी चित्रपटात बाप्पाचे बालगणेश हे लोभसवाणे रूप दाखवण्यात आले.

'माय फ्रेंड गणेशा'मधील बाप्पाचा मित्र असलेल्या बालकलाकाराचे कौतुक झाले होते. तो लहान मुलगा आता मोठा झाला असून खऱ्या आयुष्यात ती एक मुलगी आहे.

या तरुणीने नाव अहसास चन्ना असून ती एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने अभिनयाच्या कारकिर्दीला खूप लहान वयातच सुरूवात केली होती.

तिने 'माय फ्रेंड गणेशा' मध्ये आशुची भूमिका साकारली. याशिवाय तिने त्याच काळात इतरही अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार मुलाची भूमिका साकारली होती.

सध्या मात्र एहसास चन्ना उदयोन्मुख अभिनेत्री म्हणून चर्चेत येत आहे. अनेक चित्रपटांमध्ये दिसणारी ती तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेचा विषय झाल्याचे दिसते.

बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करून एहसासने इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 'वास्तूशास्त्र'मधून तिची सुरूवात झाली.

त्यानंतर तिने 'कभी अलविदा न कहना', 'माय फ्रेंड गणेशा', यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. या सर्व भूमिका मुलीच्या नसून मुलाच्या होत्या.

मुलाच्या भूमिका का साकारल्या? याबद्दलही तिने एकदा खुलासा केला आहे. ती म्हणते, "मुलाच्या भूमिका मी जाणीवपूर्वक केल्या नव्हत्या तर मला मिळाल्या होत्या."

"परिस्थितीमुळे मला त्या भूमिका कराव्या लागल्या. चार वर्षांची असताना मला 'वास्तूशास्त्र'मधली भूमिका मिळाली आणि तिथून पुढे मुलाच्या भूमिकाच येत गेल्या."

वय वाढल्यानंतर एहसासने अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याच्या जोरावर ग्लॅमरस भूमिका मिळवल्या. ओटीटीवरील 'कोटा फॅक्टरी','हाफ सीए', 'मिस्ड मॅच'मधील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.