महिला खासदाराचं BOLD फोटोशूट... चर्चा तर होणारच! तुम्ही पाहिलेत का Photos?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 10:00 PM2022-09-02T22:00:20+5:302022-09-02T22:06:19+5:30

महिला खासदाराचा 'हा' लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

मॉडेलचे बोल्ड फोटोशूट हा फारसा नाविण्याचा विषय नाही. पण एखाद्या महिला खासदाराने बोल्ड फोटोशूट करणे हा विषय नक्कीच चर्चेचा ठरू शकतो. असाच एक चर्चेत असलेला बोल्ड फोटोशूट म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Nursat Jahan) हिचा...

मॉडेल आणि अभिनेत्री कायमच बोल्ड फोटोशूट करत असतात. पण अशा व्यक्तींनी राजकारणात प्रवेश केला की ते सहसा अशा फोटोशूटपासून दूर राहणं पसंत करतात. पण खासदार नुसरत जहाँ ही याला अपवादच म्हणावी लागेल.

नुसरत जहाँ म्हणजे अभिनय आणि राजकारणातील मोठं नाव आहे. नुसरत ही बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. शिवाय तृणमूल काँग्रेसची खासदार आहे. या दोन्ही गोष्टींना समतोल राखत ती उत्तमपणे कारकीर्द घडवत आहे. या दरम्यान तिचा बोल्ड बिकीनी लूक सध्या चर्चेत आहे.

नुसरत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. नुसरतची सर्वाधिक चर्चा होते ती तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंची. आता ती पुन्हा एकदा अशाच फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नुसरतने नुकताच बोल्ड बिकीनी शूट केला आहे.

नुसरत जहाँने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. चाहते तिच्या या फोटोंचे कौतुक करत आहेत. ताज्या फोटोंमध्ये नुसरत समुद्रकिनारी ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोझ करताना दिसत आहे.

नुसरत निळ्या आणि गुलाबी रंगाच्या बिकिनी सेटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. नुसरतने तिच्या बोल्ड फोटोशूटने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे यात वादच नाही. या फोटोशूटमध्ये तिने सनग्लासेस घालून तिचा बीच लुक पूर्ण केला.

नुसरतच्या नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर तिची चर्चा आहे. लोक नुसरतच्या सौंदर्याची स्तुती करताना दिसत आहेत. तसेच तिचा मनमोहक अंदाज कोणालाही भुरळ पाडेल असाच आहे.