पांढऱ्या फ्रॉकमध्ये दिसणारी 'ही' अभिनेत्री होती रतन टाटांची गर्लफ्रेंड; ओळखा पाहू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 09:37 AM2023-03-08T09:37:35+5:302023-03-08T09:41:24+5:30

सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटीचे फोटो व्हायरल होतात. जे त्यांच्या चाहत्यांना पाहायला आवडतात. खासकरून या स्टार्सच्या बालपणीच्या फोटोंबाबत चाहते खूप उत्सुक असतात. अशाच एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो समोर आला आहे.

या फोटोमध्ये दिसणारी मुलगी तिच्या काळातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री आहे. एकेकाळी तिने प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनाही डेट केले होते. या फोटोमध्ये तुम्ही एक अतिशय गोंडस मुलगी पाहू शकता, जिने पांढरा फ्रॉक घातला आहे. फोटोत ही मुलगी तिच्या बहिणीसोबत दिसत आहे.

ओळखत नसाल तर आम्ही सांगतो, फोटोत दिसणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून सिमी ग्रेवाल आहे, जी तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. सिमी ग्रेवालने एकदा रतन टाटा यांना डेट केले होते. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांना लग्नही करायचे होते.

परंतु काही कारणास्तव हे होऊ शकले नाही. एकदा रतन टाटा जेव्हा सिमीच्या टॉक शोमध्ये पोहोचले होते, तेव्हा त्यांनीही सांगितले होते की, आमच्या लग्नाच्या चर्चा अनेकदा होत होत्या.तर सिमी ग्रेवालचे लग्न झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा खरे प्रेम मिळाल्यानंतरही अभिनेत्री एकटीच राहिली.

सिमी ग्रेवालचे पहिले लग्न रवी मोहनसोबत झाले होते. असं म्हटलं जातं की, तीन महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. मात्र हे नाते काही वर्षांतच तुटले. एवढेच नाही तर लग्नापूर्वी वयाच्या १७ व्या वर्षी सिमी ग्रेवालने जामनगरच्या महाराजांना डेटही केले होते.

सिमीच्या आयुष्यात मन्सूर अली खान पतौडीही आले होते, पण शर्मिला टागोरमुळे त्यांचे नाते तुटले. सध्याचे बोलायचे झाले तर सिमी अजूनही सिंगल आहे. सिमी ग्रेवालने 'कर्ज' आणि 'मेरा नाम जोकर' सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी जितकी प्रसिद्ध झाली. तितकीच तिच्या लव्ह लाईफचीही चर्चा झाली.

प्रेमसंबंध आणि लग्न होऊनही सिमी ग्रेवाल सिंगलच राहिली. पती रवी मोहनपासून घटस्फोट झाला असून तिला मूलबाळ नव्हते. सिमी ग्रेवालने बिझनेसमन रवी मोहनसोबत लग्न केले होते. पण फार कमी लोकांना माहित असेल की सिमी ग्रेवाल एकेकाळी रतन टाटासोबतही रिलेशनशिपमध्ये होती.

सिमी ग्रेवालने एका मुलाखतीत रतन टाटा यांच्यासोबतच्या तिच्या प्रेमाबद्दल आणि नातेसंबंधाबद्दल खुलेपणाने सांगितले. मी रतन टाटा यांना डेट करायची. आमच्यात दीर्घकाळ कनेक्शन होते असं सांगत सिमीने रतन टाटांचे कौतुक केले होते.

सिमी ग्रेवाल म्हणाल्या होत्या की, 'रतन आणि माझे खूप पूर्वीचे नाते आहे. तो एकदम परफेक्ट आहे. त्याचे सेन्स ऑफ ह्युमर अप्रतिम आहे आणि तो परफेक्ट जेंटलमेन आहे. त्याच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा राहिला नाही. परदेशात तो जेवढा निवांत राहतो, तेवढा भारतात राहत नाही.

रतन टाटा सिमी ग्रेवाल यांच्या शो Rendezvous with Simi Garewal मध्ये दिसले होते. जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड केली. याच मुलाखतीत रतन टाटा यांनी त्यांच्या अयशस्वी लग्नाबद्दलही सांगितले.