In Pics : 'विश्वसुंदरी' ऐश्वर्यासमोर मालदीवचा नजाराही पडला फिका, पती अभिषेकने शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 14:56 IST2023-02-09T14:46:04+5:302023-02-09T14:56:35+5:30
अभिषेक बच्चन म्हणतो ऐश्वर्यासमोर मालदीवचे फोटोही फिके पडले.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने नुकताच ५ फेब्रुवारी रोजी ४७ वा वाढदिवस साजरा केला. त्याने पत्नी ऐश्वर्या आणि लेक आराध्यासह मालदिव मध्ये सुट्टीचा आनंद घेतला.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या म्हणजे आदर्श कपल. आता तर त्यांची लेक आराध्याही मोठी झाली आहे आणि तिच्या साधेपणाने लक्ष वेधून घेत आहे.
अभिषेकने कुटुंबासोबतचे मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात त्याने मालदीवचा नजारा, सौंदर्य दाखवले आहे. पण खरी सुंदरता तर अभिषेकच्या समोर बसली आहे जिचा फोटो त्याने शेअर केला आहे.
पहिल्या फोटोत अभिषेक ने दूरवर दिसणारा निळाशार समुद्राचा फोटो पोस्ट केला आहे. या नजाऱ्याकाठीच बीचवर टेबल खुर्ची ठेवली आहे.
तर आणखी एका फोटोत सजावट केलेली प्लेट ठेवली आहे. यामध्ये हॅपी बर्थडे अभिषेक असे लिहिले आहे. तर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांचे नाव लिहित वेलकम होम लिहिले आहे.
याशिवाय त्याने मालदीवच्या सूर्यास्ताचा सुंदर फोटो शेअर केला आहे. मालदीवचा अप्रतिम नजारा फोटोत कॅप्चर झाला आहे.
या सगळ्या फोटोंनंतर सर्वात शेवटी अभिषेकने पत्नी ऐश्वर्याचा फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या सूटमध्ये ऐश्वर्या खरोखर विश्वसुंदरी दिसते. निळ्या डोळ्यांमुळे तिच्या सुंदरतेत भर पडली आहे.
मालदीवचे काही सुंदर नजारे विशेषत: शेवटचा फोटो असं क्युट कॅप्शनही त्याने दिलं आहे. अनिल कपूरनेही या फोटोंवर कमेंट केली करत स्तुती केली आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला १६ वर्ष झाले आहेत. तर त्यांची लेक आराध्या ११ वर्षांची आहे.