Photo: अभिज्ञाचा व्हेकेशन मूड ऑन; अबूधाबीतील प्रसिद्ध मशिदीला दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 06:25 PM2023-03-12T18:25:34+5:302023-03-12T18:31:00+5:30

Abhidnya bhave:अभिज्ञाचा पती मेहूल पै याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यावरुन ही जोडी अबुधाबीला व्हेकेशनसाठी गेल्याचं दिसून येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.

कलाविश्वात सक्रीय असलेली अभिज्ञा सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या सोशल मीडियावर अभिज्ञाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अभिज्ञा व्हेकेशनसाठी रवाना झाल्याचं दिसून येत आहे.

अभिज्ञाचा पती मेहूल पै याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यावरुन ही जोडी अबुधाबीला व्हेकेशनसाठी गेल्याचं दिसून येत आहे.

अभिज्ञाने अबुधाबीतील प्रसिद्ध मशिदीलाही भेट दिली. सोबतच तेथील काही फोटो शेअर केले आहेत.

अभिज्ञाने शेख झायेद ग्रँड या मशिदीला भेट दिली. यावेळी तिच्यासोबत मेहूल आणि तिची आईदेखील होती.

यावेळी अभिज्ञाने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी घेतली आहे. तर मेहुलने सुद्धा अभिज्ञाला मॅचिंग असा राखाडी रंगाचा शर्ट घातला आहे.

अलिकडेच अभिज्ञा तू तेव्हा तशी मालिकेत दिसली होती.

२०२२ हे वर्ष अभिज्ञा भावे साठी खूप संघर्षदायी ठरलं. मेहुलला कॅन्सरचं निदान झालं होतं. मात्र, या गंभीर आजारावर त्याने यशस्वीरित्या मात केली.