PHOTOS: सुशांतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वाला आणखी एक धक्का, १६ वर्षीय प्रसिद्ध Tik Toker सिया कक्कडने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 19:35 IST2020-06-25T19:28:15+5:302020-06-25T19:35:41+5:30
१६ वर्षीय सिया कक्कडने गुरुवारी आत्महत्या केली.

मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
१६ वर्षीय सिया कक्कडने गुरुवारी आत्महत्या केली.
सियाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलीस तपास करत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
सियाने अलीकडेच तिचा डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यामध्ये ती पंजाबी गाण्यांवर नाचताना दिसत आहे.
बुधवारी रात्री सियाचा मॅनेजर अर्जुन सरीन यांच्या मते, एका गाण्याच्या संदर्भात सियाशी त्याची बातचीत झाली होती. ती चांगल्या मूडमध्ये होती आणि ठीक होती.
मॅनेजरने सांगितले की, सियाने हे पाऊल उचलले याबाबत नेमकं काय घडले हे मला ठाऊक नाही .
सियाचे इन्स्टाग्रामवर ९१ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
TikTokवर सियाचे १. १ मिलियन फॉलोअर्स आहेत. सियाच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.