पार्थचे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 03:36 IST2016-11-14T03:36:52+5:302016-11-14T03:36:52+5:30
डिस्को सन्या या चित्रपटातून पार्थ भालेराव प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्याने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’ हा

पार्थचे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज?
डिस्को सन्या या चित्रपटातून पार्थ भालेराव प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्याने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’ हा चित्रपटदेखील केला आहे. त्याचा ‘किल्ला’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता. अशा या मराठी इंडस्ट्रीमधील बालकलाकाराच्या दोन ते तीन चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्याचे हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे समजते. तसेच, त्याच्या या तिन्ही चित्रपटांमध्ये तो मराठीतील तगड्या कलाकारांसोबत झळकणार असल्याचेदेखील समजते.