संस्कारांची बीजं रुजविणारा ‘परतु’

By Admin | Updated: December 3, 2015 02:53 IST2015-12-03T02:53:22+5:302015-12-03T02:53:22+5:30

नाटक-सिनेमामुळे पोरं बिघडतात, लोकरंजनातून लोकशिक्षण व्हावे, अशी परस्परविरोधी विधाने मधूनमधून होत असतात. खरं तरं आपला देश कीर्तनाने सुधारला नाही

'Paresu' which cultivates the seeds of Samskaras | संस्कारांची बीजं रुजविणारा ‘परतु’

संस्कारांची बीजं रुजविणारा ‘परतु’

नाटक-सिनेमामुळे पोरं बिघडतात, लोकरंजनातून लोकशिक्षण व्हावे, अशी परस्परविरोधी विधाने मधूनमधून होत असतात. खरं तरं आपला देश कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही. मात्र, सिनेमामुळे समाजमनावर बरेवाईट संस्कार होतात, एवढं खरं!
काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘डर’सारख्या सिनेमामुळे समस्त तरुणाईवर विपरित परिणाम होऊन आवडत्या मुलीने प्रेमास नकार दिल्यास, ‘तू मेरी नहीं तो किसीकी भी नहीं हो सकती’ अशा विकृत प्रवृत्ती तयार होऊन मुलींच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकणे, त्यांना पेटवून देणे, त्यांच्यावर बळजबरी करणे अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडू लागल्या.
तथाकथित थ्रिलर सस्पेन्स सिनेमामुळे चोरी, दरोडा, खुनासारख्या दुर्घटनाही घडायला लागल्या. किडनॅपिंगच्या केस वाढत असून, अल्पवयीन तरुण मुलं असली अघोरी कृत्यं करायला प्रवृत्त होत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.
आजच्या मोबाइल इंटरनेटच्या जमान्यात ‘जग जवळ आलंय.., माणसं मात्र एकमेकांपासून लांब चाललीत. रक्ताच्या नात्यांची वीण उसवायला लागली आहे. अशा कौटुंबिक दुरवस्थेच्या दिवसांत रस्त्यात सापडलेल्या एका नाव-गाव माहीत नसलेल्या अज्ञान बेवारस पोराला एक साधा शेतकरी घरी आणतो, पोटच्या पोराप्रमाणे मायेने वाढवतो. इतकंच नव्हे, तर परराज्यातल्या त्याच्या मातापित्यांचा प्राणपणाने शोध घेतो... पुढे काय होतं ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहणेच प्रत्ययकारी ठरते. नितीन अडसूळ या भारतीय तरुणाने अमेरिकन मित्रांच्या साह्याने हॉलीवूडचे तंत्रज्ञान वापरून तयार केलेला ‘परतु’ हा उत्कट जीवनानुभव देणारा चित्रपट, दि. ४ डिसेंबरपासून रूपेरी पडद्यावर दाखल होत आहे. किशोर कदम, स्मिता तांबेसारख्यांच्या सशक्त अभिनयाने नटलेल्या ‘परतु’ला डी. सी. साऊथ आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फीचर फिल्म, तर अभिनेता किशोर कदम यांना बेस्ट अ‍ॅक्टर असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. अमेरिका गाजवून भारतात प्रदर्शित होणारा नितीन अडसूळ दिग्दर्शित ‘परतु’ मराठी मनाची मशागत करण्यास सिद्ध झाला आहे.

Web Title: 'Paresu' which cultivates the seeds of Samskaras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.