Panchayat 3: 'पंचायत 3' ची तारीख कन्फर्म! 'या' दिवशी ॲमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 01:46 PM2024-05-01T13:46:21+5:302024-05-01T13:47:19+5:30

'पंचायत 3'  ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

'Panchayat 3' release date confirmed after IPL series will get released on Amazon Prime | Panchayat 3: 'पंचायत 3' ची तारीख कन्फर्म! 'या' दिवशी ॲमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित

Panchayat 3: 'पंचायत 3' ची तारीख कन्फर्म! 'या' दिवशी ॲमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित

ओटीटीवरील 'पंचायत' (Panchayat 3) या वेबसीरिजची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सीरिजची लोकप्रियता इतकी आता याचा तिसरा  भागही लवकरच भेटीस येणार आहे. 'पंचायत 3'  ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अॅमेझॉन प्राईम आणि पंचायत फेम अभिनेता जितेंद्र कुमार रिलीज डेटवरुन चाहत्यांचा अंत पाहत आहेत. काही ना काही व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना चिडवत आहेत. पण रिलीज डेट काही सांगितली जात नाहीए. आता एका रिपोर्टनुसार, 'पंचायत 3'ची रिलीज डेट कन्फर्म झाली आहे.

अॅमेझॉन प्राईम आणि जितेंद्र कुमारने कोलॅबोरेशनमध्ये व्हिडिओ शेअर केला. ज्यात जितेंद्र कुमार चाहत्यांना सर्व दुधी भोपळे काढायला सांगतोय. सर्व भोपळे काढलेत की रिलीज डेट दिसेल असं तो म्हणतो. आता दुधी भोपळ्याचं कनेक्शन हे ज्यांनी सीरिज पाहिली आहे त्यांनाच कळेल. पण अॅमेझॉनच्या या व्हिडिओमुळे चाहते आणखी वैतागले आहेत. रिलीज डेट लवकर सांगत नाही म्हणून कमेंट्समध्ये राग व्यक्त केला जातोय. मात्र आता पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'पंचायत 3' मे महिन्याच्या शेवटी रिलीज होणार आहे. IPL संपल्यावरच मेकर्स सीरिज रिलीज करणार होते. काही चाहत्यांनी कमेंट्समध्ये 17 मे हा अंदाज बांधला होता. मे महिना तर कन्फर्म झाला होताच. पण आता रिपोर्टनुसार, ही तारीख १७ नसून 28 मे असणार आहे. लवकरच मेकर्स याबद्दलची अधिकृत माहिती शेअर करतील.

'पंचायत 3' मध्ये फुलेरा गावाचा सचिव अभिषेक त्रिपाठी नसणार अशी शक्यता आहे. कारण दुसऱ्या भागाच्या शेवटीच एका वादातून आमदार अभिषेक त्रिपाठीची बदली करतो आणि तिथे सीरिज संपते असं दाखवण्यात आलंय. त्यामुळे गोष्ट आणखी इंटरेस्टिंग असणार यात शंका नाही.

Web Title: 'Panchayat 3' release date confirmed after IPL series will get released on Amazon Prime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.