पाकिस्तानच्या या अभिनेत्री व मॉडेल्सनेही केली होती सुरक्षेची मागणी
By Admin | Updated: July 20, 2016 02:41 IST2016-07-20T02:41:38+5:302016-07-20T02:41:38+5:30
कंदील बलोच हिच्या हत्येची सध्या सर्वत्रच चर्चा होत आहे.
_900_450_ns.jpg)
पाकिस्तानच्या या अभिनेत्री व मॉडेल्सनेही केली होती सुरक्षेची मागणी
कंदील बलोच हिच्या हत्येची सध्या सर्वत्रच चर्चा होत आहे. परंतु, कंदीलच काय तर पाकिस्तानमध्ये हॉट आणि बोल्ड वर्तणुकीमुळे अनेक अभिनेत्री व मॉडेल्स विरोधात फतवे काढण्यात आलेले आहेत. गृहमंत्रालयाकडे मागणी करणारी कंदील ही पहिली अभिनेत्री नाही. इतर मॉडेल्सनेही कंदील प्रमाणेच जीवाला धोका असल्याची भिती व्यक्त करुन, सुरक्षेची मागणी केली होती.
वीणा मलिक :
पाकिस्तानी अभिनेत्री व मॉडेल वीणा मलिक आपल्या बेधडक वक्तव्य व फोटोसेशनसाठी नेहमीच चर्चेत राहते. त्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्या अनेक वेळा आल्या आहेत. तिने पाकिस्तानी सरकारकडे सुरक्षेची मागणीसुद्धा केली आहे. उर्दू, पंजाबी, तेलगू चित्रपटासह वीणाने बॉलीवूडमधील ह्यगली गली में चोर हह्णै, ह्यतेरे नाल लव्ह हो गयाह्ण, ह्य सुपर मॉडेल,ह्ण ह्यमुंबई 125 किमी 3 डी,ह्ण ह्यमि. मनीह्ण या चित्रपटात काम केलेले आहे. तसेच बिग बॉक्स मध्येही ती झळकली होती.
हुमैमा मलिक : ह्यराजा नटरवालह्ण या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत या अभिनेत्रीने अनेक प्रकारचे किसींग सीन दिले आहेत. त्यामुळे हुमैमा विरोधात फतवा काढण्यात आला होता. तिने अनेकवेळा तिच्या जीवाला धोका असल्याचे मीडियाद्वारे सांगितले आहे. हुमैमा पाकिस्तानमधील टॉप मॉडेल व सर्वात महागडी अभिनेत्रीपैकी एक आहे.
मीरा : पाकिस्तानमधील ह्यनजर बुलायाह्ण या प्रसिद्ध चित्रपटाची अभिनेत्री मीराविरोधात फतवा काढण्यात आलेला आहे. मीरा ही कायम विवादात राहिली आहे. तिची बॉलीवूड एन्ट्रीही वादग्रस्तच होती. दोन पासपोर्ट बाळगणे, मालमत्ता, लग्नाचा बनाव अशा अनेक गुन्ह्यात अडकल्यामुळे ती चर्चेत आहे.
अर्शी खान : प्रसिद्ध मॉडेल अर्शी खानच्या हॉट फोटोमुळे तिच्या विरोधातही फतवा निघाला होता. ती क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीसोबतच्या संबंधामुळेसुद्धा चर्चेत राहिलेली आहे.
खळबळ उडवणारे कंदीलचे व्हिडिओ
धर्मगुरु मुफ्ती सोबतचा व्हिडीओ : पाकिस्तानमधील मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती अब्दुल सोबतचा एक व्हिडिओ तिने अपलोड केला होता. त्यामुळेही पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती.
काश्मिरवर वक्तव्य : तिने काश्मीर वादासंबंधी एक व्हिडिओ अपलोड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हटले होते की, तुम्हाला मुसलमान आवडत नसतील तर ते ठिक आहे. परंतु, त्यांना कमीत कमी मारु तरी नका.
टी-20 वर्ल्ड कप : टी -20 विश्वचषकात पाकिस्तान संघाने भारताला हरविले तर मी कपडे काढून नाचेल असे वक्तव्य तिने केले होते. पण पाकिस्तानला हा सामना जिंकता आला नाही. तेव्हा तिने सोशल मिडीयावर मोठमोठ्याने आवाज करुन, रडत असल्याचा व्हिडिओ अपलोड केला होता.
व्हेलेटाईन डे : कंदील ही पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या प्रेमात पडली होती. त्यांना भेटण्यासाठी तिने त्यांचे घरही गाठले होते. पण तिला त्यांना भेटता आले नाही. व्हेलेंटाईन डेचे निमित्त साधून तिने एका व्हिडिओद्वारे इम्रान खानविषयीचे आपले प्रेम व्यक्त केले होते.
यासोबतच तिचे इमरानची मजाक, बॅन यू-ट्यूब, इंडियन आयडल आॅडिशन हे व्हिडिओही खळबळजनक होते.