‘पाहिले न मी तुला’फेम तन्वी मुंडळेवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 17:36 IST2021-10-24T17:33:47+5:302021-10-24T17:36:31+5:30
तन्वीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

‘पाहिले न मी तुला’फेम तन्वी मुंडळेवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं निधन
झी मराठी वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’ (Pahile Na Mi Tula ) या मालिकेतील अभिनेत्री तन्वी मुंडळे (Tanvi Prakash Mundle) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तन्वीचे वडील प्रकाश मुंडळे यांचे नुकतेच निधन झाले. तन्वीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
पोस्टमध्ये तन्वी तिच्या वडिलांसोबत दिसतेय. या पोस्टमध्ये आपल्या बाबाला उद्देशून ती लिहिते, ‘तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे. खूप प्रेम आबु... माझी वेळ येईल तेव्हा आपण नक्की भेटू....’
या पोस्टवरून बापलेकीचं नातं किती मैत्रीपूर्ण होतं, याचा अंदाज येतो. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिचं सांत्वन करत, तिच्या बाबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तन्वी मुंडळे ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची आहे. कुडाळ येथेच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स ग्रुप तिने जॉईन केला. पुढे पुण्यात ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले. अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग दर्शवून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. तन्वीने याआधी ‘अ रिस्पेक्टेबल वेडिंग’, ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ अशा नाटकांतून तीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘कलरफुल’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटात तन्वी सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे.
महेश कोठारे यांनी तन्वीला ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत नायिकेच्या भूमिकेसाठी निवडले. मात्र प्रेक्षकांच्या अल्पशा प्रतिसादामुळे आणि कथानक दमदार नसल्याने ही मालिका आटोपती घेण्यात आली.