पद्म कुटुंब
By Admin | Updated: March 14, 2015 22:52 IST2015-03-14T22:52:30+5:302015-03-14T22:52:30+5:30
बॉलीवूड सुपरस्टार, अँग्री यंगमॅन, बिग बी अशी भलीमोठी बिरुदावली असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या बच्चन कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक तुरा येत्या ८ एप्रिलला खोवला जाणार आहे.

पद्म कुटुंब
बॉलीवूड सुपरस्टार, अँग्री यंगमॅन, बिग बी अशी भलीमोठी बिरुदावली असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या बच्चन कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक तुरा येत्या ८ एप्रिलला खोवला जाणार आहे. अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यापूर्वी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांना पद्मभूषण, जया बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांना पद्मश्री तर अमिताभ यांना पद्मश्री, पद्मभूषण व आता पद्मविभूषण पुरस्कार मिळत आहे. म्हणजेच बच्चन कुटुंबाचा हा सहावा पद्म पुरस्कार आहे.