‘नागरिक’साठी आॅस्करचे त्रिकूट!
By Admin | Updated: May 30, 2015 23:03 IST2015-05-30T23:03:24+5:302015-05-30T23:03:24+5:30
चित्रपटासाठी आॅस्कर विजेत्या वेशभूषाकार भानू अथय्या, साउंड डिझायनर रसुल पोकुट्टी, गायक सुखविंदर सिंग हे त्रिकूट एकत्र आले आहे.

‘नागरिक’साठी आॅस्करचे त्रिकूट!
जयप्रद देसाई दिग्दर्शित आणि आरती सचिन चव्हाण यांच्या साची एण्टरटेन्मेंट निर्मित ‘नागरिक’ या सामाजिक नीतिमूल्यावर आधारित असलेल्या चित्रपटासाठी आॅस्कर विजेत्या वेशभूषाकार भानू अथय्या, साउंड डिझायनर रसुल पोकुट्टी, गायक सुखविंदर सिंग हे त्रिकूट एकत्र आले आहे. एका दर्जेदार मराठी कलाकृतीसाठी ही दिग्गज मंडळी प्रथमच एकत्र आली आहेत. आज आपल्या मराठी चित्रपटांनी वैश्विक उंची गाठली असून, जयप्रद देसाईसारखे नव्या दमाचे दिग्दर्शक त्यात आणखी भर घालीत आहेत हे यावरून सिद्ध होत आहे.