OMG!! ​राजकुमार राव बनला ३२४ वर्षांचा म्हातारा...विश्वास बसत नसेल तर पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 11:53 IST2017-04-21T06:23:37+5:302017-04-21T11:53:37+5:30

होय, ‘राबता’ या आगामी चित्रपटात राजकुमार राव याने तब्बल ३२४ वर्षांच्या म्हाता-या व्यक्तिची भूमिका साकारली आहे.

OMG !! Rajkumar Rao became 324 years old ... If you can not believe, then see! | OMG!! ​राजकुमार राव बनला ३२४ वर्षांचा म्हातारा...विश्वास बसत नसेल तर पाहाच!!

OMG!! ​राजकुमार राव बनला ३२४ वर्षांचा म्हातारा...विश्वास बसत नसेल तर पाहाच!!

मिका कुठलीही असो,राजकुमार राव हा अभिनेता ती पडद्यावर अक्षरश: जिवंत करतो.   ३२४ वर्षे वयाच्या एका म्हाता-याची भूमिका राजकुमार रावने साकारली तर ? कल्पना करा. या कल्पनेवर कदाचित तुम्हाला हसू येईल. पण ही कल्पना आता सत्यात उतरणार आहे. होय, ‘राबता’ या आगामी चित्रपटात राजकुमार राव याने तब्बल ३२४ वर्षांच्या म्हाता-या व्यक्तिची भूमिका साकारली आहे. 



या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा अलीकडेच रिलीज झालेला ट्रेलर आपण बघितला. या ट्रेलरच्या अखेरिस एक विचित्र दिसणारा म्हातारा दिसतो. खरे तर ट्रेलरमधील या म्हाताºयाकडे आधी कुणाचेच लक्ष गेले नाही. हा म्हातारा राजकुमार राव असेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. पण हा म्हातारा राजकुमार राव आहे. या व्यक्तिरेखेसाठी १६ लूक टेस्ट घेतल्या गेल्यात. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि राजकुमार राव या दोघांनी हा परफेक्ट लूक मिळावा, यासाठी बरीच मेहनत घेतली. अखेर लॉसएंजिल्स येथून आलेल्या एका टीमच्या मदतीने हे लूक फायनल झाले.



ALSO READ : Patch up !!! ​सुशांत सिंह राजपूत अन् क्रिती सॅनन रोमॅन्टिक ड्राईव्हवर...!

हे परफेक्ट लूक मिळवण्यासाठी राजकुमार रावला मेकअपसाठी दरदिवशी पाच ते सहा तास लागायचे. खूप सारी ज्वेलरी आणि त्यासोबत अनेक टॅटू त्याला लावावे लागायचे. ही भूमिका जिवंत करण्यासाठी राजकुमारने त्याचे बॉडी पॉस्चर आणि आवाज यावर प्रचंड कष्ट घेतले. राजकुमारच्या या भूमिकेबद्दल नेमकी माहिती नाही. पण राजकुमार रावला या भूमिकेत पाहणे निश्चितच इंटरेस्टिंग असणार आहे. ‘राबता’ हा सिनेमा येत्या ९ जूनला रिलीज होता आहे.

Web Title: OMG !! Rajkumar Rao became 324 years old ... If you can not believe, then see!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.