अरेच्चा...! ही कोण आणखी एक प्रियंका

By Admin | Updated: July 13, 2016 10:23 IST2016-07-13T06:02:16+5:302016-07-13T10:23:48+5:30

रील लाईफ मध्ये हे जरी खरे असले तरी रीअल लाईफमध्ये जुळे मुलं फक्त एकाच आई-बापापासून होतात. पण प्रिंयका चोप्रासारखीचं दिसणारी एक मुलगी आहे. तिचे फोटो पाहून तुम्हीदेखिल आश्चर्यचकित व्हाल.

Oh ...! This one is another Priyanka | अरेच्चा...! ही कोण आणखी एक प्रियंका

अरेच्चा...! ही कोण आणखी एक प्रियंका

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने What's Your Raashee? चित्रपटात बारा वेगवेगळ्या भुमिका केल्या होत्या. या चित्रपटात तीचे एक दोन नव्हे तब्बल १२ भुमिका केल्या होत्या. रील लाईफ मध्ये हे जरी खरे असले तरी रीअल लाईफमध्ये जुळे मुलं फक्त एकाच आई-बापापासून होतात. पण प्रिंयका चोप्रासारखीचं दिसणारी एक मुलगी आहे. तिचे फोटो पाहून तुम्हीदेखिल आश्चर्यचकित व्हाल.
 
जगात एका चेहऱ्याची जवळपास सात माणसे असतात हे आजवर अनेक ठिकाणी ऐकण्यात आले असेलच, अगदी त्याच चेहऱ्याची सात माणसे नसली तरीही त्यातील काही बाबी अगदी तंतोतंत मिळत्याजुळत्या असतात. सध्या सोशल नेटवर्किंगवर बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सारखी दिसणारी एक मुलगी धुमाकुळ घालत आहे. कदाचित तीचे फोटो प्रियंका समजून ते लाइकही केले असावेत. पण ते फोटो प्रियांकाचे नाहीत. ते फोटो आहेत नवप्रीतचे.
 
२१ वर्षीय नवप्रीत बांगा ही वॅन्कुवरस्थित एक यूट्यूबर असून ती एक फिटनेस व्लॉगरही आहे. पण, कधीकधी ती स्वत:चा चेहरा पाहून आश्चर्यचकित होत असेल. जस तुम्ही आता झाला आहात. 
 
हा झाला तिचा दिसण्याचा भाग, पण नवप्रीतचा आवाजही 'पिगी चॉप्स'च्या आवाजाच्या फार जवळ जाणारा आहे. सध्या इंटरनेटवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये सर्वत्र झळकणारे नवप्रीतचे हे फोटो आणि प्रियांका व तिच्या चेहऱ्यातल्या साम्याची किमया अनेकांना थक्क करत आहे.
 
 
नवप्रीतच्या 'ब्राउनगर्ल लिफ्ट्स' या इन्स्टाग्राम अकाउंटवर १८००० पेक्षा जास्त फॉलोअर्स तिचे हुबेहुब प्रियांका चोप्रासारखे दिसणारे फोटो पाहून थक्कच आहेत प्रियांकाच्या रंगापासून तिचा बांधा, केशरचना, फॅशन सेन्स सारं काही नवप्रीतशी इतके मिळतेजुळते आहे कि, तिने पोस्ट केलेले फोटो पाहताना क्षणार्धासाठी ती खुद्द प्रियांकाच असल्याचा भास होतो. 
 

Web Title: Oh ...! This one is another Priyanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.