आता कोण म्हणणार ठोको ताली?
By Admin | Updated: September 21, 2016 17:07 IST2016-09-21T15:07:28+5:302016-09-21T17:07:55+5:30
प्रेक्षकांचा लाडका नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्माच्या शोमधून निरोप घेत आहे.

आता कोण म्हणणार ठोको ताली?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - कपिल शर्मा शोमधील सगळ्या व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. त्यातील एकाही कलाकाराशिवाय आपण या कार्यक्रमाचा विचारच करू शकत नाही. पण आता प्रेक्षकांचा लाडका नवज्योत सिंग सिद्धू प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नवज्योत सिंग सिद्धू हा कार्यक्रम सोडणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. पण आता त्याने हा कार्यक्रम सोडला असल्याचे त्याच्या पत्नीनेच सांगितले आहे.
सिद्धूने पंजाबमध्ये नुकताच त्याचा स्वतंत्र पक्ष सुरू केला आहे आणि त्याने त्याचे सगळे लक्ष आता या पक्षाकडे देण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच त्याने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याची पत्नी नवज्योत कौर यांनी सांगितले. सिद्धूने 30 सप्टेंबरपर्यंत दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. त्याने नुकताच त्याचा शेवटचा भाग चित्रीत केला आणि त्याच्या संपूर्ण टीमचा निरोपही घेतला.