'पिंगा'त वादग्रस्त काहीही नाही- दीपिका

By Admin | Updated: November 20, 2015 11:59 IST2015-11-20T10:31:17+5:302015-11-20T11:59:56+5:30

तमाशा या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर-दीपिकाने लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली असता दिपीकाने 'पिंगा' गाण्याच्या वादावरही मौन सोडले.

Nothing controversial in Pinga - Deepika | 'पिंगा'त वादग्रस्त काहीही नाही- दीपिका

'पिंगा'त वादग्रस्त काहीही नाही- दीपिका

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० -  'तमाशा' या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर-दीपिकाने लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली असता दिपीकाने 'पिंगा' गाण्याच्या वादावरही मौन सोडले.  इतिहास व्यवस्थित वाचून आणि अनेक संदर्भांचा अभ्यास करूनच हा चित्रपट आणि 'ते' (पिंगा) गाणं बनवण्यात आलं असून, त्यात काहीही चुकीचं किंवा वादग्रस्त दाखवण्यात आलेले नसल्याचे दीपिकाने स्पष्ट केले. 
इम्तियाज अलीच्या 'तमाशा' या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर-दीपिकाने लोकमतच्या कार्यालयाला भेट देऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. तमाशा ही एक लव्हस्टोरी असली तरी हा चित्रपट आजच्या तरूणाईशी जोडला जाणारा आहे. प्रत्येक तरूण या चित्रपटाशी रिलेट करू शकेल असा त्यांनी व्यक्त केला.
तमाशाबद्दल गप्पा मरातानाच दीपिकाला 'बाजीराव मस्तानी' तील 'पिंगा' गाण्याच्या वादाबद्दल विचारले असता तिने त्यात काहीही वादग्रस्त नसल्याचे स्पष्ट केले. या गाण्याबद्दल काही लोक नाराज आहेत, हे मला आत्ताचं समजलं, पण त्यात खरच काही वादग्रस्त नाहीये. इतिहासाचा अभ्यास करूनच हा चित्रपट व गाणं बनवलं आहे, त्यात काहीही चूकीचे दाखवलेलं नाही असं दीपिका म्हणाली.
 
 

Web Title: Nothing controversial in Pinga - Deepika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.