लग्नापासून आर्थिक स्थैर्य मिळाले नाही - मलायका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 16:43 IST2016-03-23T16:33:28+5:302016-03-23T16:43:25+5:30

मलायका आणि अरबाज खान त्यांचे १७ वर्षांचे वैवाहीक नाते संपवणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच नुकतेच दोघांचे डिनरसाठी एकत्र आल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले.

Not got financial stability from marriage - Malaika | लग्नापासून आर्थिक स्थैर्य मिळाले नाही - मलायका

लग्नापासून आर्थिक स्थैर्य मिळाले नाही - मलायका

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २३ - मलायका आणि अरबाज खान त्यांचे १७ वर्षांचे वैवाहीक नाते संपवणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच नुकतेच दोघांचे डिनरसाठी एकत्र आल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यामुळे घटस्फोट ही निव्वळ अफवा होती असे अनेकांना वाटले. पण स्पॉटबॉय.कॉम या एंटरटेनमेन्टच्या वेबसाईटच्या वृत्तानुसार मलायका आणि अरबाजमध्ये काहीही आलबेल नसून, मलायकाने नुकतीच प्रसिद्ध वकिल वंदना शहा यांची भेट घेतली. वदंना शहा या घटस्फोटाचे खटले हाताळतात. 
 
मलायकाने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा यासाठी अरबाजचा भाऊ सलमान खान प्रयत्न करत आहे. स्पॉटबॉय.कॉमच्या वृत्तानुसार मलायकाला तिचा १४ वर्षांचा मुलगा अरहानचा ताबा हवा आहे. अरबाजला मुलाला भेटण्यापासून रोखणार नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. 
 
लग्नापासून कोणतेही आर्थिक स्थैय मिळाले नसल्याचीही तिची तक्रार आहे. आपण सामन्य सूनेसारखे घरगुती आयुष्य जगावे अशी अरबाजच्या कुटुंबियांची इच्छा आहे पण ती आपल्याला मान्य नाही असे तिने सांगितले. मलायकाने अजून घटस्फोटासाठी अर्ज केला नसला तरी, कुठल्याही दिवशी हे घडू शकते. 

Web Title: Not got financial stability from marriage - Malaika