नोरा फतेहीने 'नाच मेरी रानी' गाण्यावर लगावले ठुमके, पुन्हा व्हायरल झाला व्हिडीओ

By तेजल गावडे | Updated: November 4, 2020 21:30 IST2020-11-04T21:29:46+5:302020-11-04T21:30:40+5:30

नोरा फतेहीने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे.

Nora Fatehi sings 'Nach Meri Rani' song, video goes viral again | नोरा फतेहीने 'नाच मेरी रानी' गाण्यावर लगावले ठुमके, पुन्हा व्हायरल झाला व्हिडीओ

नोरा फतेहीने 'नाच मेरी रानी' गाण्यावर लगावले ठुमके, पुन्हा व्हायरल झाला व्हिडीओ

बॉलिवूडमध्ये दमदार डान्सच्या जोरावर आपले स्थान निर्माण करणारी नोरा फतेही नेहमी चर्चेत असते. नुकतेच तिचे नाच मेरी रानी हे गाणे रिलीज झाले होते. हे गाणे पाहता पाहता व्हायरल झाले. नोरा फतेही आणि गुरू रंधावाचे गाणे नाच मेरी रानी एकीकडे युट्यूबवर धुमाकूळ माजवत आहे तर दुसरीकडे नोरा फतेहीचा डान्स व्हिडीओ धमाका करतो आहे. काही तासांपूर्वी नोरा फतेहीने या गाण्यावर आणखीन एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. 


नोरा फतेहीचा या व्हिडीओत ब्लॅक पँट आणि क्रॉप टॉपमध्ये दिसते आहे. तिच्यासोबत कोरियोग्राफर आदिल खानदेखील दिसतो आहे. व्हिडीओत नोराचे डान्स मुव्ह्ज चाहत्यांना खूप भावतो आहे. हा व्हिडीओ नोराने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओत नोरा नाच मेरी रानी गाण्यावर नवीन स्टेप करताना दिसते आहे. नाच मेरी रानी गाण्यातील नोराचे डान्स मुव्ह्ज आणि एक्सप्रेशन दोन्ही कमाल वाटत आहेत.


नोरा फतेही नुकतीच सोनी टीव्हीवरील शो इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये जज परीक्षकेच्या भूमिकेत दिसली होती. तिच्यामुळे या शोची टीआरपीदेखील वाढली होती. खरेतर नोरा फतेही इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये मलायका अरोराच्या जागी आली होती. मलायका सेटवर परतल्यानंतर नोराला शो सोडावा लागला. 


नोरा फतेही लवकरच भुज द प्राइड ऑफ इंडिया चित्रपटात झळकणार आहे. असे म्हटले जाते आहे की या चित्रपटात नोरा फतेही डान्स करताना दिसणार आहे. नोरा शेवटची स्ट्रीट डान्सर थ्रीडीमध्ये दिसली होती.

Web Title: Nora Fatehi sings 'Nach Meri Rani' song, video goes viral again