व्हॅनिटी व्हॅन नव्हे, कम्फर्ट झोन

By Admin | Updated: September 12, 2015 04:38 IST2015-09-12T04:38:29+5:302015-09-12T04:38:29+5:30

कुठल्याही चित्रपटाची शूटिंग म्हटली की धावपळ, थकवा ही गोष्ट ओघाने येतेच. अशा वेळी मधात एखादा ब्रेक मिळाला की काही क्षण एकांतात रिलॅक्स व्हावेसे वाटते.

No Vanity Van, Comfort Zone | व्हॅनिटी व्हॅन नव्हे, कम्फर्ट झोन

व्हॅनिटी व्हॅन नव्हे, कम्फर्ट झोन

कुठल्याही चित्रपटाची शूटिंग म्हटली की धावपळ, थकवा ही गोष्ट ओघाने येतेच. अशा वेळी मधात एखादा ब्रेक मिळाला की काही क्षण एकांतात रिलॅक्स व्हावेसे वाटते. असा एकांत मिळविण्यासाठीच आताच्या स्टार्सनी स्वत:चा कन्फर्ट झोन उभा केला आहे. या कम्फर्ट झोनचे नाव आहे ‘व्हॅनिटी व्हॅन’. शूटिंगदरम्यान मेकअप करायचा असेल वा थोडा वेळ निवांतपणा हवा असेल तर लगेच ही स्टार मंडळी पंचतारांकित सुखसुविधा असलेल्या व्हॅनिटी व्हॅनचे दार उघडतात. असेच काही स्टार व त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनची ही स्पेशल स्टोरी...

शाहरूख खान
बॉलीवूडचा बादशहा सर्वात महागड्या व्हॅनिटी व्हॅनचा मालक आहे. या व्हॅनमध्ये पंचतारांकित हॉटेलात उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. बेडरूम, हॉल, डायनिंग रूम, जीम, बार, मेकअप रूम हे सारेच यात आहे. नुकतीच त्याने नवी डीसी व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. ही व्हॅन दिलीप छाबरिया यांनी डिझाइन केली आहे.

अक्षय कुमार : रोमानियामध्ये ‘सिंग इज ब्लिंग’ची शूटिंग करताना सेटवर व हॉटेलमध्येही अक्षय कुमारला त्याचा कन्फर्ट झोन मिळत नव्हता. अखेर त्याने आपल्यासाठी बुल्गेरियातून व्हॅनिटी व्हॅन बोलाविली. अक्षयच्या या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मसाज चेअर, फुल साइज बेडरूम व आरामदायक बेड, सर्व सोयीयुक्त किचन व मोठा डायनिंग हॉलही आहे.

सलमान खान : मध्यम प्रकाश देणारे लाइट्स, हायटेक , सुपर कन्फ र्ट असा उल्लेख सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाबत करावा लागेल. सुपर लक्झरिअस असलेली त्याची व्हॅनिटी व्हॅन एकदम खास आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये लावण्यात आलेले सलमानचे विविध पोझमधील स्पेशल पोर्ट्रेट त्याची इन्स्पिरेशन वाढवीत असतात.

हृतिक रोशन : अल्ट्रा लक्झरीअस व्हॅनिटी व्हॅनचा मालक असलेल्या हृतिक रोशनची व्हॅन हृतिक एवढीच आकर्षक आहे. लाकडाच्या व काचांच्या सुरेख संगमातून हिचे डिझाइन साकारण्यात आले आहे. हाय टेक असलेल्या या व्हॅनमध्ये हृतिकच्या आवडत्या निळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.

सोनम कपूर : पॉश, स्पेशिअस, एलइडी लाइट्स, फ्लॅट टीव्ही सोनम कपूरने आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लावून घेतलाय. आपली व्हॅनिटी व्हॅन ही पर्सनालिटीचे प्रतिबिंबच असते हे तिला चांगलेच ठाऊक असल्याचे दिसतेय. म्हणूनच तर सोनमने तशी आपल्या व्हॅनची रचना केली आहे.

अजय देवगण : अजय देवगणची व्हॅनिटी व्हॅन ही जरा हटके आहे. गुजरातच्या एका डिझायनरने तयार केलेल्या या फुल इक्विप्ड व्हॅनमध्ये सर्व सुविधांसह सुसज्ज जीमही आहे. अजयला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी त्याने खास तयार करून घेतल्या आहेत, विशेष म्हणजे त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचे डिझाइन एकदम डॅशिंग आहे.

वरुण धवन : वरुण धवन याने काही दिवसांपूर्वी त्याच्या नव्या व्हॅनिटी व्हॅनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. एखाद्या वेल फर्निश्ड् घरासारखे काचेचे दरवाजे व स्टायलिश फर्निचर असलेल्या या व्हॅनमध्ये भरपूर स्पेस असून तो येथे आनंदाने उड्या मारू शकतो असेही त्याने आपल्या व्हॅनची प्रसंशा करताना लिहिलेय.

आलिया भट्ट : बॉलीवूडमध्ये नवखी असलेल्या आलिया भट्टजवळही स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन आहे. आलियाची व्हॅनिटी व्हॅन ही सुसज्ज असून वेल डेकोरेट करण्यात आली आहे. चांगला कन्फर्ट मिळावा यासाठी तिने या व्हॅनमध्ये काही विशेष बदल करून घेतले आहेत.

Web Title: No Vanity Van, Comfort Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.