तलवारीला नाही धार !
By Admin | Updated: October 3, 2015 02:03 IST2015-10-03T02:03:02+5:302015-10-03T02:03:02+5:30
दिल्लीजवळील नोएडातील आरुषी हत्याकांड प्रकरणाने देशाला हादरवून टाकले होते. या दुहेरी हत्याकांडानंतर सर्वत्र हीच चर्चा होती की, काय आईवडील आपल्या मुलीची हत्या करू शकतात?

तलवारीला नाही धार !
दिल्लीजवळील नोएडातील आरुषी हत्याकांड प्रकरणाने देशाला हादरवून टाकले होते. या दुहेरी हत्याकांडानंतर सर्वत्र हीच चर्चा होती की, काय आईवडील आपल्या मुलीची हत्या करू शकतात? या हत्याकांडावर आधारित मेघना गुलजार यांचा ‘तलवार’ हा चित्रपट रिलीज झाला आहे.
चित्रपटाची कथा नोएडा पोलिसांच्या चौकशीने सुरू होते. डॉ. टंडन (नीरज काबी) आणि डॉ. नूतन टंडन (कोंकणा सेन शर्मा) यांच्या १४ वर्षांच्या मुलीची श्रुतीची (आयशा परवीन) हत्या होते. प्रथम घरातील नोकरावर संशय घेतला
जातो. मात्र दुसऱ्या दिवशी या नोकराचा मृतदेह घराच्या छतावर आढळून येतो. नोएडा पोलीस श्रुतीच्या आईवडिलांकडे याप्रकरणी बोट दाखवितात तेव्हा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जातो.
सीबीआयचे अधिकारी अश्विनी कुमार (इरफान खान) यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू
होतो आणि मृत नोकराच्या दोन मित्रांना दोषी ठरविले
जाते. याच काळात सीबीआयचे तपास अधिकारी बदलण्यात येतात. सीबीआयच्या दुसऱ्या तपासात श्रुतीच्या आईवडिलांना
हत्येसाठी जबाबदार ठरविण्यात येते, तर अश्विनी यांच्यावर नोकरांना फसविण्याचा आरोप ठेवला जातो. सीबीआयच्या दोन वेगवेगळ्या तपासांत
दोन निष्कर्ष निघतात़ त्यामुळे हे प्रकरणच बंद करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र न्यायालय चौकशी सुरू ठेवण्याचा आदेश देते. या प्रकरणात अखेर श्रुतीच्या आईवडिलांना शिक्षा होते.
------------
जमेच्या बाजू : मेघना गुलजार यांनी हत्याकांडाच्या तपासालाच चित्रपटाचा मूळ आधार बनविले आहे. पोलीस आणि सीबीआयच्या तपासातील बेजबाबदारपणाही अधोरेखित केला गेला आहे. तपासाच्या एकूण प्रकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे आणि चित्रपटाला तपासातील एका प्रकरणाप्रमाणेच हाताळले आहे. इरफानने हे दाखवून दिले आहे की, तो श्रेष्ठ कलाकारांमध्ये का गणला जातो. कोंकणा सेन यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे; पण नीरज काबी फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. एकूणच बॉक्स आॅफिसवर जादू करण्याइतपत चित्रपटात धार नाहीय.