यशासाठी मेकअपची गरज नाही : कंगना
By Admin | Updated: October 24, 2014 03:11 IST2014-10-24T00:04:23+5:302014-10-24T03:11:27+5:30
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतचे म्हणणे आहे की, यशासाठी मेकअपची नव्हे, तर प्रतिभेची गरज असते. कंगना नुक तीच एका कॅम्पेनच्या निमित्ताने वंचित वर्गातील मुलींना भेटली

यशासाठी मेकअपची गरज नाही : कंगना
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतचे म्हणणे आहे की, यशासाठी मेकअपची नव्हे, तर प्रतिभेची गरज असते. कंगना नुक तीच एका कॅम्पेनच्या निमित्ताने वंचित वर्गातील मुलींना भेटली. तिने काही मुलींशी चर्चाही केली. बॉलीवूडमध्ये तिचे पदार्पण आणि चित्रपटांमधील महिलांच्या भूमिका कशा प्रकारे बदलत आहेत, याबद्दल तिने मुलींना सांगितले. कंगना म्हणाली, ‘मी मुलींशी बोलले. या मुलींना मी मार्गदर्शन केले आणि फिल्म इंडस्ट्रीमधील करिअरच्या संधीबाबत चर्चा केली. मी त्यांना हे समजण्यास मदत केली की, एखाद्याच्या आशेवर जगण्याहूनही जीवनात बरेच काही करण्यासारखे आहे. विशेषकरून जेव्हा अभिनेत्रींचा विचार केला जातो. येथे सौंदर्याला महत्त्व आहे; पण मी येथे फक्त सुंदर दिसायला आलेली नाही. फक्त फिल्म इंडस्ट्रीत नव्हे, तर समाजातही मुलगी सुंदर असावी, अशी अपेक्षा असते.’